Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PM Modi Team India : पंतप्रधान मोदींनी वर्ल्डकप ट्रॉफीऐवजी रोहित-द्रविडचा हात पकडला, नेमकं काय आहे कारण ?

11

नवी दिल्ली : T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाने बार्बाडोसहून परतल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भारतीय संघ चार्टर फ्लाइटने भारतात परतला आणि त्यानंतर लगेचच पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी भारतीय खेळाडूंनी पंतप्रधानांसोबत नाश्ता केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी चॅम्पियन खेळाडू आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत फोटो सेशन केलं. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी वर्ल्डकपला हात न लावता रोहित आणि राहुल द्रविडचा हात पकडला. पंतप्रधानांचा हाच फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधानांनी असं का केलं असेल? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. चला तर मग जाणून घेऊ त्याचं उत्तर

पंतप्रधान मोदींनी वर्ल्डकप ट्रॉफीला हात का लावला नाही ?

असं बोललं जात की, एखाद्या व्यक्तीने किंवा संघाने ट्रॉफी किंवा पदक जिंकले असेल तर त्याच व्यक्तींनी त्याला हात लावावा. कारण त्या जेतेपदावर फक्त त्यांचाच हक्क असतो. अगदी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत देखील असं पाहायला मिळतं. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी वर्ल्डकप ट्रॉफीला हात लावला नाही.
Hathras Stampede: ‘हाथरस’ सत्संग आयोजन समितीतील ६ जणांना पोलिसांकडून अटक, मुख्य आरोपीवर पोलिसांकडून १ लाख रु बक्षीस जाहीर

भारतीय संघाची विक्टरी परेड उशिराने सुरू होणार

भारतीय संघाची विक्टरी परेड ही आता उशिरा सुरु होणार असल्याचे समोर आले आहे. भारतीय संघाची विक्टरी परेड ही संध्याकाळी ५.०० वाजता नरिमन पॉइंट येथून सुरु होणार होती. पण आता ही विक्टरी परडे उशिरा का सुरु होणार आहे, याचे कारण समोर आले आहे.

भारताचा संघ हा दुपारी २.०० वाजता दिल्लीहून मुंबईसाठी रवाना होणार होता. त्यानंतर भारताचा संघ मुंबईत दुपारी ४.०० वाजता दाखल होणार होता. मुंबईत दाखल झाल्यावर भारतीय संघ थेट नरिमन पॉइंट येथे पोहोचणार आणि तिथून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ते जाणार होते. पण या कार्यक्रमात आला बदल झाला आहे. भारतीय संघ जो दुपारी ४.०० वाजता मुंबईत दाखल होणार होता, तिते ते ५.२० मिनिटांनी दाखल होणार असल्याचे समोर येत आहे. भारतीय संघाला दिल्लीहून मुंबईकडे येताना जास्त वेळ लागला. त्यामुळे या विक्टरी परेडची वेळही बदलण्यात आली आहे. भारतीय संघ आता संध्याकाळी ५.३० वाजता मुंबईत दाखल होईल, असे समोर येत आहे. त्यानंतर भारताचा संघ साधारण संध्याकाळी ६.०० किंवा ६.३० वाजता नरिमन पॉइंट येथे दाखल होईल आणि त्यानंतर संध्याकाळी ७ ते ७.०३० च्या दरम्यान के वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील. त्यामुळे आता भारताच्या विक्टरी परेडमध्ये एक ते दिड तास उशिर होणार असल्याचे आता समोर आले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.