Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : वारंवार होणारे अपघात व हवाई दलाच्या शेकडो जवानांचे मृत्यू यामुळे ‘उडत्या शवपेट्या’ म्हणून कुप्रसिद्ध ठरलेल्या ‘मिग-२१’ या लढाऊ विमानांना कायमची रजा देण्याची योजना संरक्षण दलाने आखली आहे. पुढील वर्षभरात म्हणजे सन २०२५ मध्ये ही लढाऊ विमाने आपल्या ताफ्यातून काढून टाकण्याची योजना हवाई दलाने तयार केली आहे. हवाई दल त्यांच्याऐवजी ‘तेजस’ ही लढाऊ विमाने सैन्यदलांमध्ये समाविष्ट करीत आहे.‘मिग-२१’ हे जागतिक शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनने विकसित केलेले लढाऊ विमान आहे. मिग-२१ चे पहिले उड्डाण १६ जून १९५५ रोजी रशियात झाले. सध्या जगातील चार खंडांतील सुमारे ६० देश त्याचा वापर करीत आहेत. १९६० च्या दशकात हवाई हलात सहभागी झालेल्या मिग-२१ विमानांनी १९७१च्या बांगलादेश युद्धात अभूतपूर्व कामगिरी केली होती. मात्र, नंतरच्या काळात हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचा वेग वाढल्यानंतर मिग विमानांतील त्रुटी व तांत्रिक दोष ठळकपणे समोर आले होते.
शेवटचे तीन स्क्वाड्रन
१९६६ ते १९८४ दरम्यान भारताकडे ८४० ‘मिग-२१’ लढाऊ विमाने होती. केंद्र सरकारने २०१७ नंतर ‘मिग-२१’ विमानांना निरोप देण्यासाठी पर्याय शोधण्याची प्रक्रिया वेगवान केली. आता पुढील वर्षी ही लढाऊ विमाने हवाई दलातून पूर्णपणे हटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता हवाई दलात ‘मिग-२१’च्या फक्त तीन स्क्वाड्रन उरल्या आहेत व ती फळी पुढील वर्षी निवृत्त होणार आहे. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये २० लढाऊ विमाने असतात.
असे आहे विमान
– ‘मिग-२१’ लढाऊ विमान शक्यतो एक पायलट उडवतो. या ४८.३ फूट लांबीच्या विमानाची उंची साडेतेरा फूट आहे
– ताशी २१७५ किलोमीटर वेगाने ‘मिग-२१’ उडते. हे विमान कमाल ५७,४०० फुटांची उंची साडेआठ मिनिटांत गाठते
– सध्याच्या ‘मिग-२१’ विमानांत प्रतिमिनिट २०० राउंड गोळीबार करणाऱ्या ‘२३ मिमी’च्या तोफा बसवलेल्या आहेत
– हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे व ५०० किलो वजनाचे दोन बॉम्बही या विमानांत बसविले जाऊ शकतात.