Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus Ace 4: हा फोन आल्यास होईल सर्वांची सुट्टी; 6500mAh बॅटरीची टेस्टिंग करत आहे कंपनी

10

OnePlus चीनमध्ये नवीन डिवाइस सादर करण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे या डिवाइसमध्ये आतापर्यंत कधी न पाहिलेले स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. सध्या 5G नेटवर्कमुळे बॅटरीवर जास्त ताण येत आहे, हे ओळखून कंपनी मोठी बॅटरी असलेले डिवाइस सादर करण्याची तयारी करत आहे.

काही दिवसांपूर्वी OnePlus Ace 3 Pro स्मार्टफोन 6,100mAh च्या बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. आता एका लीकमध्ये टिप्‍सटर डिजिटल चॅट स्‍टेशन (DSC) नं म्हटलं आहे की ओप्पो आणि वनप्‍लस सारख्या ब्रँड सोबत काम करणाऱ्या Ouga group ऑफ कंपनीज 6500 एमएएचची बॅटरी लाँच करेल. तसेच टिप्‍सटरनं OnePlus 13 आणि OnePlusAce 4 बाबत देखील माहिती दिली आहे.
OnePlus Ace 3 Pro: लॅपटॉपपेक्षा दुप्पट रॅमसह आला वनप्लसचा फोन; सर्वात मोठी बॅटरीही सोबत

डिजिटल चॅट स्टेशननुसार, ओगा ग्रुप 6,500mAh बॅटरीसह फोन लाँच करेल. सध्या कंपनी प्रोटोटाइप या बॅटरीसह टेस्‍ट करत आहे. डीसीएसच्या मते भविष्यात वनप्‍लस पहिली कंपनी असू शतके ज्यांच्या फोनमध्ये 6500 एमएएच बॅटरी मिळेल.

DCS च्या वीबो पोस्टनुसार, पुढील वर्षापर्यंत येणाऱ्या दोन नवीन वनप्लस स्‍मार्टफोनमध्ये 1.5K आणि 2K रिजोल्यूशन असलेला मायक्रो-कर्व्ड फ्लॅट डिस्प्ले मिळेल. हे वनप्लस एस 4 आणि वनप्लस 13 असू शकतात. यांची बॅटरी कपॅसिटी 6000 एमएएच पेक्षा जास्त असू शकते.

OnePlus 13 मध्ये क्‍वॉलकॉमचा सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. वनप्‍लस एस 4 स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह पॅक केला जाऊ शकतो. OnePlus Ace 4 Pro तो डिवाइस असू शकतो, ज्यात 6500 एमएएचची बॅटरी दिली जाईल.

भारतात आला वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट

OnePlus Nord CE4 Lite 5G काही दिवसांपूर्वी भारत आला आहे. ज्यात 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले 2100 nits ब्राइटनेससह मिळतो. यातील Snapdragon 695 चिपसेटला 8GB RAM व 256GB पर्यंत स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर 13MP चा फ्रंट कॅमेराही आहे. यातील 5500mAh ची बॅटरी 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.