Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Xiaomi Robot Vacuum Cleaner X10: बंद घर देखील राहील चकाचक; येतोय शाओमीचा छोटू रोबोट

10

Xiaomi Robot Vacuum Cleaner X10 भारतीय बाजारात लाँच होणार आहे. यात 4000Pa ची सक्शन कॅपसिटी, 200ml चा वॉटर टँक आणि 5200mAh ची बॅटरी कॅपसिटी देण्यात आली आहे. हा स्टँडर्ड मोड मध्ये 180 मिनिटांपर्यंत क्लीनिंग करू शकतो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शाओमी रोबोट व्हॅक्युम क्लिनर एक्स१०
Xiaomi भारतात आला नवीन व्हॅक्युम क्लीनर 9 जुलैला लाँच करणार आहे. हा Robot Vacuum Cleaner X10 असेल ज्यात 4000Pa ची सक्शन कॅपसिटी देण्यात आली आहे. परंतु कंपनीचा हा व्हॅक्युम क्लीनर इतर मार्केट्समध्ये आधीच उपलब्ध आहे.

शाओमीच्या मते, हा धूळ आणि पाळीव प्राण्यांचे केस देखील सहज खेचून घेतो आणि सहनदार सफाई करू शकतो. यात LDS लेजर नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जिच्या मदतीनं संपूर्ण घर स्कॅन करून त्याचा नकाशा बनवतो आणि प्रत्येक कोपरा स्वच्छ करतो. यातील शेड्यूलिंग फिचर तुम्ही घरी नसल्यावर देखील घर साफ करण्यास मदत करते.

शाओमी रोबोट व्हॅक्युम क्लिनर एक्स10ची किंमत

Xiaomi Robot Vacuum Cleaner X10 कंपनी भारतात किती रुपयांमध्ये लाँच करेल याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु कंपनीनं अधिकृत वेबसाइटवर याचा लाँच टीज आला आहे. Vivo Y28s 5G: 14 हजारांत आला विवोचा तगडा फोन; असे आहेत फीचर्स

Xiaomi Robot Vacuum Cleaner X10चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Robot Vacuum Cleaner X10 मध्ये 4000Pa ची सक्शन कॅपसिटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 2.5L ची डिस्पोजेबल बॅग मिळते. ही बॅग 60 क्लीनिंग सेशन हँडल करू शकते. यात 200ml चा वॉटर टँक देण्यात आला आहे ज्यामुळे 80 मिनिटे पोछा मारता येईल. व्हॅक्युम क्लीनरमध्ये 5200mAh ची बॅटरी कॅपसिटी देण्यात आली आहे. हा स्टँडर्ड मोड मध्ये 180 मिनिटांपर्यंत क्लीनिंग करू शकतो. हा धूळ आणि पाळीव प्राण्यांचे केस सहज खेचून घेऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे सफाई करतो.

व्हॅक्युम क्लीनर कंट्रोल करण्यासाठी यात स्मार्टफोन अ‍ॅपची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. अ‍ॅपच्या मदतीनं तुम्ही तुमच्या घराचा क्लीनिंग प्लॅन आवश्यकतेनुसार कस्टमाइज करू शकता. यात MJA1 Security Chip आहे जी हार्डवेयर सुरक्षित ठेवते आणि डेटा ट्रांसमिशन सिक्योरिटी देखील देते. यात LDS लेजर नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जिच्या मदतीनं ही संपूर्ण घर स्कॅन करून नकाशा बनवते आणि प्रत्येक कोपरा साफ करते. Redmi 13 5G स्मार्टफोन देखील कंपनी या व्हॅक्युम क्लीनरसह लाँच करणार आहे.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.