Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ‘शूर्पणखा’ नको; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला

20

हायलाइट्स:

  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता
  • चाकणकर यांच्या नियुक्तीआधीच भाजपकडून टीका
  • चित्रा वाघ यांनी चाकणकरांना दिली शूर्पणखेची उपमा

पुणे: राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चिन्हं आहेत. मात्र, अधिकृत घोषणा होण्याआधीच भाजपनं चाकणकरांवर टीका केली आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरच्या माध्यमातून चाकणकर यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे. वाघ यांनी कोणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख चाकणकरांकडंच असल्याचं बोललं जातंय. ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ त्या जागेवर बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,’ असं वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपच्या नेत्या विजया रहाटकर या याआधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. राज्यातील भाजपची सत्ता गेल्यापासून हे पद रिक्त आहे. राष्ट्रवादीच्या माजी आमदार व प्रवक्त्या विद्या चव्हाण, माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांची नावं या पदासाठी चर्चेत होती. मात्र, चाकणकर यांचं नाव अंतिम करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यावरून वाघ यांनी चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील महिलांच्या प्रश्नावर चित्रा वाघ या भाजपकडून तर, चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसकडून किल्ला लढवत असतात. त्यातून याआधीही त्यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. वाघ यांच्या या ट्वीटवर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास चाकणकर यांनी नकार दिला आहे.

हेही वाचा:

‘NCB बोगस कारवाया करते, माझ्या जावयालाही खोट्या प्रकरणात अडकवलं’

एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही का?; नवाब मलिक यांचा सवाल

आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबण्याची शक्यता, कारण…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.