Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

CMF Student Referral: कंपनीनं सुरु केली “लाडके विद्यार्थी” योजना? फोन, बड्स, वॉच मोफत मिळवण्याची संधी

10

CMF Student Referral: सीएमएफ बाय नथिंगनं एक स्टुडंट रेफरल प्रोग्राम सुरु केला आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सीएमएफ फोन 1, बड्स प्रो 2 आणि वॉच प्रो 2साठी मोफत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सीएमएफ फोन १
सीएमएफ बाय नथिंगनं आपल्या आगामी अपकमिंग प्रोडक्ट सीएमएफ फोन 1, बड्स प्रो 2 आणि वॉच प्रो 2साठी एक स्पेशल स्टूडेंट रेफरल प्रोग्राम लाँच केला आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन CMF Phone 1, CMF 20 Buds Pro 2 आणि Watch Pro 2 मोफत मिळवता येतील. या रेफरल प्रोग्राम मध्ये 7 जुलैपर्यंत सहभाग घेता येईल. चला जाणून घेऊया या प्रोग्राम संबंधित माहिती.

मोफत CMF प्रोडक्ट जिंकण्यासाठी काय करावे

यासाठी सर्वप्रथम https://in.cmfstudentreferral.tech/ वर लॉग इन करा. तुमची माहिती भरा आणि व्हेरिफाय करा. व्हेरिफिकेशन झाल्यावर जिंकण्यासाठी पॉइंट्स गोळा करावे लागतील. लॉग इन करताना एखाद्या मित्राचा रेफरल कोड वापर केल्यास तुमच्या स्कोर आणि लीडरबोर्डवर त्याच्या स्कोरमध्ये एक बोनस पॉईंट जोडला जाईल. लीडरबोर्डवरील टॉप 50 विद्यार्थ्यांना नवीन सीएमएफ लाइनअपमधून 10 सीएमएफ फोन 1, 20 बड्स प्रो 2 आणि 20 वॉच प्रो 2 पैकी एक जिंकण्याची संधी मिळेल.
Vivo Y28s 5G: 14 हजारांत आला विवोचा तगडा फोन; असे आहेत फीचर्स

कंपनीनं स्पष्ट सांगितलं आहे की देशभरातील विद्यार्थी युनिक रेफरल कोड मिळवण्यासाठी मायक्रोसाइटवर रजिस्ट्रेशन करू शकतात. तसेच प्रत्येक रेफरलसाठी रेफरर आणि रेफर केल्या गेलेलंय विद्यार्थ्याला पॉइंट्स मिळतील.

CMF Phone 1 येतोय बाजारात

सीएमएफ फोन 1, बड्स प्रो 2 आणि वॉच प्रो 2 हे प्रोडक्ट 8 जुलैला लाँच केले जातील. स्मार्टफोन कस्टमाइजेबल रियर पॅनलसह येणार असल्याचं स्पष्ट झळा आहे. तर वॉच प्रो 2 मध्ये इंटरचेंजेबल बेजल्स मिळणार आहेत. तर सीएमएफ बड्स प्रो 2 मध्ये 50 डीबी पर्यंत हायब्रीड अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी) चा सपोर्ट दिला जाईल.

सीएमएफ फोन 1 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. कारण नथिंग आधीपासूनच प्रीमियम फोन 30 ते 50 हजारांच्या बजेटमध्ये विकत आहे. ही किंमत लिक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. टिप्सटर योगेश बरारनं दावा केला आहे की सीएमएफ फोन 1 भारतात बँक कार्ड डिस्काउंटसह 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. ही 6GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत असेल. टिपस्टरनुसार, 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला दुसरा मॉडेल देखील येईल, जो बँक डिस्काउंटनंतर 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.