Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Honor 200 5G Series: दोन-दोन सेल्फी कॅमेर्यांसह येतोय शानदार फोन; करणार का वनप्लसची सुट्टी

10

Honor 200 5G Series: ऑनरटेक भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरिज सादर करणार आहे. जी ऑनर 200 5जी नावाने लाँच होईल आणि यात Honor 200 5G आणि Honor 200 Pro 5G चा समावेश केला जाईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
ऑनर २०० ५जी सीरिज
Honor 200 5G Series च्या भारतीय लाँचची तारीख घोषित करण्यात आली आहे. लाइनअपमध्ये Honor 200 5G आणि Honor 200 Pro 5G सादर केले जातील. या दोन्ही डिव्हाइसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI फीचर्स मिळतील. तसेच, दोन्ही हँडसेटमध्ये कर्व्ड स्क्रीनसह शानदार कॅमेरा आणि पावरफुल बॅटरी व प्रोसेसर मिळेल.

Honor 200 5g Series लाँच डेट

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर अ‍ॅक्टिव्ह मायक्रोसाइटनुसार, Honor 200 5G Series 18 जुलैला लाँच केली जाईल. या सीरीजचा लाँच इव्हेंट दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल, ज्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर पाहता येईल.
Moto Razr 50 Ultra 5G: दोन-दोन डिस्प्ले असलेला मोटोरोलाचा फोन आला भारतात; सोबत 10 हजारांचं गिफ्ट मोफत

असे असू शकतात स्पेसिफिकेशन

आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, आगामी सीरीजच्या बेस मॉडेल म्हणजे Honor 200 5G मध्ये 6.7 इंचाचा क्वॉड कर्व्ड डिस्प्ले दिला जाईल, तर HONOR 200 Pro 5G मध्ये 6.78 इंचाचा क्वॉड कर्व्ड डिस्प्ले मिळेल. या दोन्ही स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. यांची पीक ब्राइटनेस 4000 निट्स असेल. दोन्ही डिवाइस अनेक शानदार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील.

ऑनर 200 आणि 200 प्रो 5जी मध्ये शानदार फोटोज क्लिक करण्यासाठी OISला सपोर्ट असलेला 50MP चा मेन सेन्सर आणि 50MP ची टेलीफोटो लेन्स दिली जाईल. तसेच, 200 5जीच्या फ्रंटला सिंगल आणि 200 प्रो 5जी मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल.

HONOR 200 सीरीजच्या दोन्ही मोबाइल फोन्समध्ये 5,200mAh ची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते, जी 100W फास्ट चार्जिंगसह येईल. दोन्हीमध्ये ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल.

किती असू शकते किंमत

स्मार्टफोन ब्रँड ऑनरनं आतापर्यंत 200 5जी सीरीजच्या लाँचिंग बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लीक्सनुसार, लाइनअपची किंमत 40 ते 50 हजार दरम्यान ठेवली जाऊ शकते. खऱ्या किंमतीची माहिती लाँच इव्हेंट नंतरच मिळेल.

HONOR X9b 5G

ऑनर एक्स9बी 5जी यावर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची किंमत 25,998 रुपये आहे. या हँडसेटमध्ये 6.78 इंचाचा कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

या हँडसेटमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 108MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच, सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी 5800mAh ची आहे.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.