Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
BSNL 4G Service: सरकारी कंपनीची 4जी सर्व्हिस पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टपर्यंत लाँच केली जाईल. आता कंपनीनं 4G प्लॅन लाँच करून सर्वांना धक्का दिला आहे. तसेच कंपनीनं अलीकडेच 10,000 4G टॉवर उभारले आहेत. BSNL नं सोशल मीडियावर एक पोस्ट करके 4जी प्लॅनची माहिती दिली आहे.
BSNL 4G प्लॅन
- PV2399: BSNL च्या या प्लॅनची किंमत 2,399 रुपये आहे. या प्लॅनसह 395 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये 100 फ्री SMS आणि 2GB रोज डेटा मिळेल.
- PV1999: या प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांची वैधता मिळेल आणि एकूण 600GB डेटासह 100 फ्री SMS मिळतील. या प्लॅनमध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.
Jio and Airtel Plans: हे आहेत जिओ आणि एअरटेलचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स; नवीन महागले, आता ग्राहकांना खर्च करावे लागतील अधिक पैसे
- PV997: BSNL चा हा प्लॅन 160 दिवसांच्या वैधतेसह येतो. याची किंमत 997 रुपये आहे. यात रोज 2GB डेटा सह 100 फ्री SMS मिळतील.
- STV599: BSNL चा हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि ह्यात अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 3GB डेटा मिळेल.
- STV347: या प्लॅनची किंमत 347 रुपये आहे आणि त्याचबरोबर 54 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात रोज 2GB डेटासह 100 फ्री SMS मिळतात. तसेच कंपनी अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
- PV199: BSNL चा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात रोज 2GB डेटा मिळतो आणि त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 फ्री SMS मिळतात.
- PV153: या प्लॅनमध्ये 26 दिवसांची वैधता मिळते. यात एकूण 26GB डेटा आणि 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.
- STV118: यात 20 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 100 फ्री SMS आणि 10GB डेटा मिळतो. थोडक्यात हा के डेटा बूस्टर प्लॅन आहे.