Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iQOO Z9 5G EMI: आयकू झेड9 5जी स्मार्टफोन दमदार डिस्काउंट मिळत आहे. तसेच यावर ईएमआय ऑफर देखील आहे त्यामुळे हा फोन फक्त 1067 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल.
iQOO Z9 5G ची किंमत
या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु आहे. फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. फोन दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. यात ग्रीन आणि ब्लू चा समावेश आहे.
Moto Razr 50 Ultra 5G: दोन-दोन डिस्प्ले असलेला मोटोरोलाचा फोन आला भारतात; सोबत 10 हजारांचं गिफ्ट मोफत
हा अॅमेझॉनवरून खरेदी केल्यास 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. परंतु ही ऑफर फक्त SBI च्या कार्डने पेमेंट केल्यास मिळेल. फोन 1,067 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल.
iQOO Z9 5Gचे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120hz आणि पीक ब्राइटनेस 1800 nits आहे. फोन HDR सपोर्ट आणि DT Star2-Plus Glass प्रोटेक्शनसह येतो.
iQOO च्या या 5G फोनचे दोन व्हेरिएंट येतो. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM सह 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच, याचा टॉप व्हेरिएंट 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह येतो.
iQOO Z9 5G स्मार्टफोनमध्ये 44W FlashCharge चार्जिंग सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C चार्जिंग पोर्ट मिळतो.
या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर देण्यात आला आहे. iQOO Z9 5G फोन Android 14 आधारित FunTouch OS 14 वर चालतो.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागे ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP चा मेन Sony IMX882 सेन्सर आणि 2MP चा दुसरा सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
इतर फीचर्स पाहता या फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये 8GB RAM वाढवण्याचा ऑप्शन देखील मिळतो. वॉटर आणि डस्टपासून वाचवण्यासाठी यात IP54 रेटिंग देण्यात आली आहे.