Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Virat Kohli’s Phone: विवोची जाहिरात करणार विराट वापरतोय ‘या’ कंपनीचा फोन; वॉलपेपरमुळे आला चर्चेत

13

Virat Kohli’s Phone: विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मुंबईत साजरा केला. परेड नंतर 4 जुलैच्या रात्री कोहली मुंबई विमानतळावर दिसला होता. तेव्हा त्याच्या हातातील फोनने अनेकांचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विराट कोहली
मुंबईमधील विश्वचषकाच्या मिरवणुकीत विराट कोहली भारतीय क्रिकेट संघासोबत सहभागी झाला होता. परेड संपल्यावर किंग कोहली लंडनला आपल्या कुटुंबाला भेटायला निघाला. जेव्हा तो मुंबई विमानतळावर पोहोचला तेव्हाच एक व्हिडीओ आता वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराटच्या फोनवर असलेल्या वॉलपेपरची खूप चर्चा झाली तर विवोची जाहिरात करणारा विराट भलत्याच कंपनीचा फोन वापरत आहे, हे देखील नेटकाऱ्यानी नमूद केले.

विशेष म्हणजे फोनच्या वॉलपेपरवर अनुष्का, किंवा मुलांचा फोटो नसून विराटने निम करोली बाबांचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवला होता, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. परंतु विराट व्हिडीओमध्ये अ‍ॅप्पल आयफोन वापरत असल्याचं देखील दिसलं. विशेष म्हणजे यावर्षी मार्चमध्ये विवोनं विराट कोहलीला आपला ब्रँड अँबॅसिडर बनवलं होतं. जाहिरात विवोची आणि खऱ्या आयुष्यात वापर आयफोनचा, ही बाब नेटकऱ्यांना खटकली.
iQOO Z9 5G Discount: फक्त 1067 रुपयांमध्ये घरी घेऊन या 8GB रॅम असलेला फोन; अशी आहे ईएमआय ऑफर

कोणता आयफोन वापरतो विराट

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विराटच्या हातात तर दिसत आहे पण तो कुठला याचा फक्त अंदाज बांधता येईल. फोनच्या कॅमेरा मोड्यूल आणि डायनॅमिक आयलंडवरून हा आयफोन 15 प्रो लाइनअप मधील हँडसेट वाटतो. त्यातही विराटकडे आयफोन 15 प्रो मॅक्स असण्याची शक्यता जास्त आहे.
https://www.instagram.com/reel/C9AzMCgSM63/https://www.instagram.com/reel/C9AzMCgSM63/

iPhone 15 Pro Max चे स्पेसिफिकेशन्स

आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये 6.7 इंचाचा XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो अलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 2000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं A17 Pro चिपसेटचा वापर केला आहे. त्याचबरोबर 1TB पर्यंतची मिळते.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48MP मुख्य कॅमेरा, 12MP चा सेकंडरी सेन्सर आणि 12MP चा थर्ड कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनच्या फ्रंटला सिरॅमिक शील्ड आहे तर बॅक पॅनल ग्लासचा आहे.

हँडसेट ब्लॅक टायटेनियम, व्हाइट टायटेनियम, ब्लू टायटेनियम आणि नॅचरल टायटेनियम कलरमध्ये खरेदी करता येईल. पाणी आणि धुळीपासून संरक्षण देण्यासाठी कंपनीनं IP68 रेटिंग देखील दिली आहे. या फोनची किंमत 1,59,999 रुपयांपासून सुरु होते.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.