Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
वडनेर येथील सराफास हिंगणघाट येथील वणा नदीचे पुलावर लुटणाऱ्या गुन्हेगारांना 24 तासाच्या आत जेरबंद करुन, त्यांचे ताब्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व ईतर मुद्देमालासह एकुण 15,32,673/- रू चा माल केला जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी सुभाष विनायक नागरे वय 43 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांनी दि(06) रोजी तक्रार दिली कि ते दि(05) रोजी त्याचे वडनेर येथील सौभाग्य ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान रात्री 8.00 वाजता बंद करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एैवज तसेच हिशोबाच्या डायऱ्या व चाब्यासह बॅगमध्ये भरून मोटर सायकलने हिंगणघाटकडे एकटेच येत असतांना वणा नदीचे पुलावर अंदाजे 9.00 वाजता चे दरम्यान एका पल्सर 220 मोटर सायकलवरील तीन अनोळखी ईसमांनी त्यांला अडवुन त्यांचेवर चाकुने वार करून जख्मी केले व त्याचे जवळील सोन्या-चांदीचे दागिने व रोख 71,000/-रूपये तसेच हिशोबाच्या डायऱ्या व दुकानाची चाबी असा एकुण 13,43,960 /-रू चा एैवज जबरीने हिसकावुन चोरून घेवुन पळुन गेले. अशा. फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 890/2024 कलम 309 (6), 3(5) भारतीय न्याय संहिता सन 2023 अन्वये गुन्हा नोंद केला होता
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरूल हसन यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलिस अंमलदार यांची 04 पथके तयार करून गुन्हयातील आरोपी निष्पन्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर गुन्हयाचे गांर्भीय समजुन वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडुन समांतर तपास करीत असतांना फिर्यादी याचे वडनेर येथील सोन्या-चांदीचे दुकानाचे सभोवती असलेल्या सिसीटीव्ही कॅमेरा फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हयात संशयीत ईसम 1) सुरेश राजु ईटनकर वय 26 वर्ष 2) कुणाल दशरथ दुर्गे वय 23 वर्ष रा. दोन्ही वडनेर यांना ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने सखोल विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे गावातील मुख्य आरोपी 3) आनंदसिंग उर्फ गोलु पंजाबसिंग टाक वय 24 वर्ष रा. वडनेर याचेसह मिळुन गुन्हयाचा कट रचुन घटनेच्या दिवशी दिनांक 05/07/2024 रोजी आंनदसिग टाक याला फिर्यादी रात्री 08.00 वाजता दरम्यान दुकान बंद करून सोन्या-चांदीचे दागिन्यासह बॅग सोबत घेवुन एकटाच मोटरसायकलने हिंगणघाटकडे निघाल्याची फोनव्दारे माहिती दिली व त्याचा पाठलाग केला. गुन्हयाचे कटाप्रमाणे फिर्यादीची वेळोवेळी फोनव्दारे माहीती देवुन वणा नदीचे पुलावर दबा धरून बसुन असलेले आरोपी 3) आनंदसिंग उर्फ गोलु पंजाबसिंग टाक वय 24 वर्ष रा. वडनेर व त्याचा साळा 4) दिलेरसिंग उर्फ हडडी नेपालसिंग बावरी वय 19 वर्ष 5) रणविरसींग उर्फ विरा कालुसिंग भादा वय 23 वर्ष रा. दोन्ही शीख बेडा सांवगी मेघे वर्धा यांना दिली. ठरल्याप्रमाणे फिर्यादी हे वणा नदीचे पुलावर येताच दबा धरून बसलेल्या तिन्ही आरोपींनी त्याचेजवळ असलेल्या 220 बजाज पल्सर मोटर सायकलने फिर्यादिस अडवुन रणविरसिंग भादा याने चाकुने फिर्यादीचे पायावर वार करून जख्मी करून खाली पाडले व फिर्यादी जवळील सोन्या-चांदीची बॅग व नगदी पैसे असा ऐवज जबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेले.
सदर गुन्हा हा अंत्यत क्लिस्ट व गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये गुन्हे शाखा वर्धा यांनी सदर गुन्हयात 24 तासाचे आत गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून आरोपी 1). आनंदसिंग उर्फ गोलु पंजाबसिंग टाक वय 24 वर्ष रा. वार्ड न. 5 आंबेडकर चैक वडनेर 2). दिलेरसिंग उर्फ हडडी नेपालसिंग बावरी वय 19 वर्ष रा. शीख बेडा सावंगी मेघे व त्याचा नातेवाईक 3). रणविरसींग उर्फ विरा कालुसिंग भादा वय 24 वर्ष रा. शीखबेडा सांवगी मेघे वर्धा 4). सुरेश राजु ईटनकर वय 26 वर्ष रा. वार्ड न. 1, कन्या शाळेजवळ वडनेर ता. हिंगणघाट जि. वर्धा 5). कुणाल दशरथ दुर्गे वय 23 वर्ष रा. वार्ड न. 1 हनुमान मंदीर जवळ वडनेर ता.हिंगणघाट जि वर्धा] यांना अटक करून त्याचेपासुन गुन्हयातील जबरीने हिसकावलेला मुद्देमाल 1) सोन्याचे (पिवळया) धातुचे दागिने एकुण वजन 118.97 ग्रॅम कि रूपये 12,94,423/- 2).चांदीचे (पांढऱ्या) धातुचे दागिने एकुण वजन 38.500 ग्रॅम किंमत रूपये 3,999/-.- 3).गुन्हयात वापरलेला चाकु (गुप्ती) किंमत 500-रू 4). गुन्हयात वापरलेली वाहन एक 220 बजाज पल्सर मोटर सायकल क्र एम. एच. 49 ए. डी. 3198 किंमत 1,00,000- रूपये] 5 ) जबरीने हिसकावलेली नगदी रक्कम 37,750 रूपये 6) आरोपीतांचे गुन्हा करतांना वापरलेले 05 अँड्रॉइड मोबाईल किंमत 96,000/- रूपये 7) फिर्यादीची बॅग ज्यामध्ये हिशोबाच्या 3 डायरी व दुकानाच्या चाब्या एक बॅकेचे पासबुक एक खाली पर्स ज्यावर सौभाग्य ज्वेलर्स लिहुन असलेले फिर्यादी याचे आधारकार्ड ओळखपत्र पॅनकार्ड लायसन्स गाडीचे आरसीबुक एटीएम कार्ड असा एकुण 15,32,673/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरूल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि गुन्हे शाखा यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि अमोल लगड, सलाम कुरेशी, पोहवा संतोश दरगुडे गजानन लामसे चंद्रकांत बुंरगे सचिन इंगोले यशवंत गोल्हर भुषण निघोट प्रमोद पिसे महादेव सानप पवन पन्नासे रितेष शर्मा नापोशि मनीश काबंळे रामकिसन ईप्पर, राकेश आष्टणकर गोपाल बावणकर मंगेष आद, अरविंद इंगोले हर्शल सोनटक्के सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथक प्रमुख पोउनि भारत वर्मा पोहवा प्रविण देशमुख प्रशांत ढोबरे व त्याचे अधिनस्त पोलीस अंमलदार करीत आहे.