Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
HONOR X9b 5G Discount: हातोड्याप्रमाणे मजबूत फोन मिळतोय 20 हजारांच्या आत; कर्व्ड डिस्प्लेसह आहे 256GB स्टोरेज, 108MP कॅमेरा पण
HONOR X9b 5G Discount: ऑनर एक्स9बी 5जी सध्या अॅमेझॉनवर दमदार डिस्काउंटसह विकला जात आहे. हा फोन कर्व्ड डिस्प्लेसह येतो, तसेच या डिस्प्लेच्या मजबुतीची प्रात्यक्षिक कंपनीनं लाँचच्या वेळी दाखवले होते.
HONOR X9b 5G वरील ऑफर
अॅमेझॉनवर HONOR X9b 5G च्या 8GB रॅम व 256GB व्हेरिएंट सध्या 30,999 रुपयांच्या ऐवजी प्लॅटफॉर्मवर 25,998 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर ग्राहकांना 16 टक्के सूट दिली जात आहे. इतकेच नव्हे तर ग्राहकांना सर्व बँक कार्ड ट्रँजॅक्शनवर 6,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील दिला जात आहे.
CMF Phone 1: फोन एक रंग अनेक! कस्टमायजेबल डिजाइन आणि दणकट प्रोसेसरसह आला सीएमएफ फोन 1
या डिस्काउंटनंतर फोनची प्रभावी किंमत 19,998 रुपये होईल. त्याचबरोबर ग्राहक जुना फोन एक्सचेंज करून 24,698 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळवता येईल. परंतु मॅक्जिमम डिस्काउंटसाठी फोनची कंडीशन चांगली असणे आवश्यक आहे. इथे नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील ग्राहकांना दिला जात आहे.
HONOR X9b 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.67 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1.5के रिजोल्यूशन, 1200 निट्स पीक ब्राइटनेस, 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1920 हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंग सपोर्ट असलेला डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित मॅजिकओएस 7.2 वर चालतो.
प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो ए710 जीपीयू आहे. त्याचबरोबर 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मिळते. फोनची स्टोरेज वापरून 8जीबी पर्यंत रॅम वाढवता येतो. स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनीनं कोणताही पर्याय दिला नाही.
फोनमध्ये मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 108 एमपीचा प्रायमरी सेन्सर, 5 एमपीचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 एमपीचा मॅक्रो सेन्सर आहे. तर फ्रंटला 16 एमपीचा सेल्फी शुटर मिळतो. यातील 5800एमएएचची बॅटरी 35वॉट फास्ट चार्जिंगला मदत करते.