Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वृद्धेला सोडून क्रू विमानातून उतरला, मुलगा मदत मागत राहिला… दिल्ली विमानतळावर संतापजनक घटना

12

नवी दिल्ली: माझी मदत करा माझ्या आईची तब्येत जास्त बिघडली आहे. कमीत कमी त्यांनी विमानातून खाली उतरवण्यात तरी माझी मदत करा. तुम्ही लोक आमाहाला असं सोडून कसं जाऊ शकता. कमीत कमी आम्हाला व्हिलचेअर तरी द्या, एक मुलगा आपल्या आईसाठी विमानातील स्टाफकडे विनवण्या करत होता. पण, कोणीच त्यांची मदत केली नाही. ही धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्लीत घडली आहे.

जयपूर येथून आपल्या ८४ वर्षीय आईला घेऊन सुशील गोस्वामी हे दिल्लीला येत होते. सुशील यांनी सांगितलं की, रविवारी संध्याकाळी जयपूर ते दिल्ली आयजीआय विमानतळावरुन एलाएन्सच्या विमानातून आपली आई शशिकला गोस्वामी यांच्यासोबत येत होते. विमान हे निश्चित वेळेपेक्षा एक तास उशिराने रवाना झाली. ते ९.२२ वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचले.
Bhayandar News: एकमेकांचा हात धरला अन् लोकलसमोर आडवे झाले, भाईंदरमध्ये पिता-पुत्राचा हादरवणारा अंत

आईसाठी स्टाफकडे व्हिलचेअरची मागणी

दिल्ली पोहोचल्यानंतर त्यांनी क्रू मेंबरकडे व्हिलचेअर मागितली. तेव्हा त्यांनी देतो असं सांगितलं आणि त्यानंतर एकएक करुन ते सर्व विमानातून खाली उतरले. विमानात कोणीच नव्हतं आणि त्यांनी विमानातील एसीही बंद केला. त्यामुळे सुशील यांच्या आईला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ते विमानाच्या दारातून ओरडत होते, मदतीसाठी हाक मारत होते, पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही. इकडे त्यांच्या आईची तब्येत बिघडू लागली. अखेर त्यांनी आपल्या आईला हातात उचललं आणि विमानातून खाली उतरले, अशी माहिती सुशील यांनी दिली.

आईला हातात उचलून विमानातून उतरण्याची वेळ

सुशील यांनी सांगितलं की त्यांच्या आईला शुगरसोबतच पार्किंसंसचा आजारही आहे. त्यांना चालता येत नाही. विमानातून खाली उतरल्यानंतर त्यांना रनवेजवळ एक तरुण दिसला. त्यांनी त्या युवकाकडे मदत मागितली. त्या तरुणाने क्रू मेंबर्सला अनेक फोन केले पण कोणीही फोन घेतला नाही. सुशील आईला हातात घेऊन उभे होते. जवळपास २० मिनिटांनी त्यांनी आईला खाली बसवलं आणि लगेजच्या ठिकाणी गेले. तिथे असलेली व्हिलचेअर घेऊन आले आणि मग त्यांनी आईला व्हिलचेअरवर बसवलं.

सुशील आपल्या आईला घेऊन अनेक तास रनवेवर उभे होते. रात्री जवळपास साडेदहा वाजता त्यांना रनवेवर एक कार येताना दिसली. ते कारसमोर उभे झाले कारण त्यांना काय करावं कळत नव्हतं. कार थांबल्यावर कळालं की ते पायलट होते. त्यांनी पायलटमध्ये मदत मागितली. यानंतर पायलटने त्यांना टर्मिनल तीनवर सोडलं.

सुशील हे आईला घेऊन गुरुग्राम येथील आपला मोठा भाऊ अवनीश गोस्वामींच्या घरी गेले. जेव्हा त्यांनी घरी गेल्यावर आपल्या आईची शुगर लेव्हल तपासली तेव्हा ती ५६ वर पोहोचली होती. ते लवकरच या घटनेची तक्रार करणार असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.