Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दुधाच्या टँकरची धडक, डबल डेकर बस अनेकदा उलटली, भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू, ३० जखमी

9

उन्नाव: उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे भीषण रस्ते अपघात झाला आहे. येथे लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस-वेवर टँकर आणि डबल डेकर बसमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेनंतर बस अनेकदा उलटली. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस (यूपी९५ टी ४७२०) बिहारच्या सीतामढी येथून दिल्लीला येत होती, पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास उन्नावच्या बेहटा मुजावर परिसरातील गढी गावाजवळ येताच मागून येणाऱ्या भरधाव दुधाच्या टँकरने या बसला ओव्हरटेक केलं आणि यातच या दोघांची धडक झाली. ही घटना इतकी भीषण होती की डबल डेकर बस अनेकदा उलटली आणि काहीच क्षणात परिसरात मृतदेह पसरलेले दिसून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं.
Mumbai Hit And Run: मैत्रिणीकडून त्याला शहापूरला नेलं, दोन दिवस लपवलं, मिहीरची आई, दोन बहिणी पोलिसांच्या ताब्यात

डॉक्टरांनी १८ जणांना मृत घोषित केलं

रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बांगरमऊचे पोलिस अधीक्षक मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. येथे डॉक्टरांनी १८ जणांना मृत घोषित केलं. तर गंभीर जखमींना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. मृतांमध्ये १४ पुरुष आणि तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं

1. दिलशाद मुलगा अश्फाक, मेरठ, वय सुमारे २२ वर्ष
2. बिटू, बिहार, वय अंदाजे ९ वर्षे
3. रजनीश, बिहार
4. लालबाबू दास, रामसूराज दास यांचा मुलगा, बिहार
5. रामप्रवेश कुमार
6. लाल बहादूर दास यांचा मुलगा भारतभूषण कुमार
7. बाबू दास मुलगा रामसूराज दास
8. मोहम्मद सद्दाम, मोहम्मद बशीर, बिहार
9. नगमा मोहम्मद शहजाद , दिल्ली
10. शबाना पत्नी मोहम्मद शहजाद
11. चांदनी पत्नी मोहम्मद शमशाद, मुल्हारी
12. मोहम्मद शफीक मुलगा अब्दुल
13. मुन्नी खातून पत्नी अब्दुल बासिक
14. तौफिक आलम मुलगा अब्दुल बसीर

इतर चौघांची ओळख अद्याप पटलेली नाही

या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशनची गती वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी याबाबत एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील केली, ‘जनपद उन्नाव रस्ते अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दु:खद आणि हृदय विदारक आहे. मृतांच्या कुटुंबीयांबाबत मी संवेदना व्यक्त करतो. जिल्हा प्रशासनाला घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यात गती आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभू श्री रामांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्मांना आपल्या श्री चरणांमध्ये स्थान द्यावं आणि जखमींना लवकर बरं करावं’.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.