Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
परदेशात शिक्षण घेणे किंवा परदेशात नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते पण खूप कमी जणांचे हे स्वप्न पूर्ण होते. अनेक अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतो, खूपवेळा तुम्ही निराश होता. पण घाबरू नका, ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगितले आहेत, जे तुमचे परदेश गमन सोपे करु शकता. शास्त्रानुसार हे उपाय केले तर यश मिळते अशी मान्यता आहे, पाहूया ते उपाय.
राहुला ठेवा प्रसन्न, सर्व कामे मार्गी लागतील
कोणत्याही कुंडलीत राहू ग्रह परदेश प्रवासात विशेष भूमिका बजावतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचे बारावे घर सक्रिय असेल तर त्या व्यक्तीला निश्चितच परदेश प्रवासाचा आनंद मिळतो. तथापि, राहूला ज्योतिष शास्त्रातही पाप ग्रह मानले गेले आहे. हा ग्रह प्रत्येक कामात अडथळे निर्माण करतो.
त्यामुळे तुमची सर्व कामे यशस्वी व्हावीत असे वाटत असेल तर राहू ग्रहाला प्रसन्न करूनच ते काम सुरू करा. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात काही अडथळे आल्यास ‘राहू स्तोत्र’ चा जप करा. हे किमान एक जपमाळ म्हणजे दिवसातून 108 वेळा करा. याशिवाय राहू बीज मंत्राचाही जप करू शकता. या मंत्राचा 40 दिवसात 18000 वेळा जप केल्याने फायदा होतो. गरजवंतांना शनिवारी उडीद डाळ आणि नारळ दान केल्याने राहु ग्रह प्रसन्न होतो.
माता लक्ष्मी करेल तुमची मनोकामना पूर्ण
चौरंगावर लाल किंवा पांढरे कापड ठेवून त्यावर लक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना करा आणि नंतर पश्चिमेकडे तोंड करून तुपाचा दिवा लावा. नंतर एक शंख घेऊन त्यावर केशर मिश्रीत पाण्याने स्वस्तिक बनवा आणि देवी लक्ष्मीजवळ स्थापित करा. यानंतर लक्ष्मी आणि शंख यांची पूजा करून अन्नदान करा.
माता लक्ष्मी आणि शंखाची प्रतिष्ठापना केल्यानंतर स्फटिक जपमाळ घेऊन ‘ओम अनंग वल्लभये विदेश गमनार्थ कार्य सिद्ध्यर्थे नमः’ हा जप करावा. वास्तविक, या चमत्कारी मंत्राचा पाच दिवसांत किमान ११ हजार वेळा आणि जास्तीत जास्त २४ हजार वेळा जप केला पाहिजे. शेवटी माता लक्ष्मीचे चित्र मंदिरात ठेवा आणि शंख वस्त्रात गुंडाळून अशा ठिकाणी ठेवा, जिथे कोणी स्पर्श करू शकत नाही, अशा प्रकारे तुम्हाला परदेश प्रवासाशी संबंधित अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल.
मंगळवारी करा हा उपाय
शुक्ल पक्षाच्या मंगळवारी बाटलीत मध भरून ‘ओम नमो बजरंग’ मंत्राचा तीनदा जप करा. यानंतर, निर्जन ठिकाणी जा आणि ही बाटली मातीत गाडून टाका. सरळ मार्गाने घरी या, मागे वळून पाहू नका. स्नानानंतर शुक्ल पक्षातील मंगळवारपासून 108 दिवस नियमितपणे सुंदरकांड पठण करा, त्याचा खूप लाभ होईल. दररोज हनुमानजींच्या मंदिरात जाऊन पूजा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा. त्यानंतर हनुमानजींच्या मूर्तीभोवती तीन वेळा प्रदक्षिणा घाला.
संक्रमणाच्या दिवशी करा हा उपाय
- कोणत्याही संक्रांतीच्या दिवशी ( जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो, त्याला राशी परिवर्तन, संक्रमण किंवा संक्राती असे म्हणतात. वर्षभरात १२ संक्रांती असतात)
- फक्त पांढरे तीळ आणि थोडा गूळ घ्या. यानंतर सूर्यास्ताच्या वेळी मातीच्या भांड्यात या वस्तू भरा आणि त्याला पिंपळाच्या पानाने झाकून टाका. मग ते भांड रूई झाडाच्या मुळाशी ठेवा आणि सरळ घरी या. मागे वळून पाहू नका. घरी आल्यावर केशर घातलेल्या पाण्याने स्नान करा आणि कुलदेवतेचे स्मरण करा. तुमच्या परदेशवारीमधील अडचण दूर होईल.
हे रत्न परिधान केल्याने होईल लाभ
शास्त्रानुसार चार ते सहा रतीचा गोमेद त्रिधातुमध्ये घालून तो परिधान केल्यास परदेश प्रवासातील अडथळे दूर होतात. यासोबतच बुधवारपासून ४९ दिवस कबुतरांना बाजरी खायला द्या. गुरुवारपासून तुळशीच्या जपमाळाने, ‘अनन्याश्चितयंतो माये जनापयर्पासने। नेषा नित्या मियुक्तानां योगक्षेम वहांम्यहम्।। या मंत्राचा जप करा. तुम्हाला यश मिळाले की नदीत ती जपमाळ प्रवाहीत करा. तुमच्या परदेशवारीत किंवा परदेशात काही काम होत नसेल तर एक लिंबू घेऊन त्यात 7 लवंगा लावा. तसेच 1 जपमाळ ‘ॐ कें केतवे नमः’।
या मंत्राचा जप करा आणि पाण्यात प्रवाहीत करा, असे सात सोमवार करावे.