Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Crime News : कूलर बंद झाल्याच्या निमित्ताने वाद विकोपाला गेला, आनंदाच्या क्षणी भर लग्नात घडला अनर्थ

10

जबलपूर : जबलपूरमध्ये सगळेजण साखर झोपेत असताना भयंकर घटना घडली. कूलर बंद असण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि नको ते घडलं. मंगळवारी मध्यरात्री २ वाजता विजय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मेट्रो लॉन मॅरेज गार्डनमध्ये एक दुःखद घटना उघडकीस आली. मेट्रो लॉन मॅरेज गार्डनमध्ये लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या एका तरुणाने कूलर बंद असल्याने वाद निर्माण केला. वाद इतका विकोपाला गेला, की तरुणाने वधूच्या भावाची (मामाचा मुलगा) हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपी फरार आहेत.

मंगळवारी १९ वर्षीय तरुण राज अहरिवार आपल्या आत्याच्या मुलीच्या लग्नासाठी आला होता. जबलपूरमधील मेट्रो लॉन मॅरेज गार्डनमध्ये तो लग्नासाठी पोहोचला होता. लग्न सुरू असतानाच काही कारणांमुळे लग्नात असलेला कूलर बंद झाला. कूलर बंद झाल्याने मुलाकडील आलेल्या पाहुण्यांनी एकच गोंधळ घातला. त्यावेळी राज या तरुणाने मुलाकडील लोकांना २ मिनिटांत कूलर सुरू होईल असं सांगितलं. त्यावरुन मुलाकडील एका पाहुण्यासोबत राजचा वाद झाला. वादावेळी राजने त्या पाहुण्याच्या कानशिलात लगावली.
Jalgaon News : रात्री कुटुंबासोबत हसत-खेळत झोपले, सकाळी आयुष्य संपवलं; उपचारादरम्यान व्यापाऱ्याचा दुर्दैवी अंत
त्यानंतर राजने कानशिलात लगावलेल्या तरुणाने लग्नाच्या हॉलच्या बाहेर जात त्याच्या तीन मित्रांना फोन करुन बोलावून घेतलं आणि राजवर चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यात राज गंभीर जखमी झाला. कुटुंबियांना या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी राजला रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
Anshuman Singh : ‘माझं मरण चारचौघांसारखं नसेल…’ वीरपत्नीने जागवल्या हुतात्मा अधिकाऱ्याच्या आठवणी

या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तर राजवर हल्ला करणारे इतर तीन आरोपी फरार आहेत. सीएसपी भगतसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. राजवर हल्ला करणाऱ्या इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हसत्या – खेळत्या कुटुंबातील आनंदाच्या क्षणी दु:खाचा डोंगर कोसळला. या हल्ल्याच्या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.