Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नेमके प्रकरण काय
सीएम नितीश कुमार आज बिहारमधील गायघाट ते कंगनघाट परिसरातील रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याला गेले होते. सोहळ्यासाठी नितीश कुमार गेले असता त्यांनी आयएसएस अधिकाऱ्याला लवकर रस्ता वेळेत पूर्ण करा पाहिजेतर तुमच्या पाया पडतो असे म्हणाताना दिसतात. हाच प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला सीएमने असे प्रकारे अधिकाऱ्यांचे पाय पकडणे लोकांच्या टीकेचा विषय बनला आणि यावरुन नितेश कुमारांना टार्गेट करण्यात आले.
तेजस्वी यादव यांनी याच व्हिडिओवरुन नितीश कुमार यांना कमजोर मुख्यमंत्री असे संबोधित केले आहे. इतका असाह्य, अशक्त, अमान्य, असक्षम ,लाचार मुख्यमंत्री मी पाहिला नाही अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधला तसेच नितीश कुमार अधिकाऱ्यांचा असे प्रकारे पाय पडणे वैगरेची गोष्ट कशी करतात यावरुन त्यांचा सरकारी अधिकाऱ्यांवर अंकुश नाही असे दिसून येते, म्हणूनच राज्यातील वाढते अपराध, भष्ट्राचार फोफवला, प्रशासकीय दबाव राहीला नाही मुख्यमंत्र्यांचे कोणीही ऐकत नाही अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे.
तेजस्वी यादव पुढे म्हणाले की लोकप्रतिनिधीचे सरकारी कर्मचारी ऐकत नसतील मुख्यमंत्र्यांचे कोणीही ऐकत नसेल तर राज्याचा कारभार कसे चालेल ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. यामध्ये अधिकारी किंवा कोणत्याही कर्मचार्यांचा दोष नाही कारण त्यांना माहित पडले अकार्यक्षम मुख्यमंत्र्यामुळे बिहारमध्ये तेच होणार जे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ठरवले कारण निवडणुकीत ४३ सीट जिंकून तिसऱ्या नंबरच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री बनले आहेत.