Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सेवाभावी संस्था व आगामी न.पा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा..!

10

(शैलेश चौधरी)

एरंडोल: तालुक्यात अजूनही सुमारे ३७हजार नागरीक हे विना लसीचे आहेत.लस न घेतलेल्या अश्या नागरीकांची शोध व जनजागृती मोहीम आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेले सामाजिक कार्यकर्ते व एरवी पञकबाजी करून चमकोगीरी करण्यासाठी धडपडणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राबवावी अशी सूचना पुढे येत आहे.तसेच लस न घेतलेल्या नागरीकांनी प्रणवनगरामधील कुटुंबप्रमुखाचे वास्तव उदाहरण डोळ्यासमोर ठेवून स्वयंस्फूर्तीने लसीकरणासाठी पुढे यावे असा सूर उमटत आहे.एरंडोल येथे १५हजार पाचशे अकरा व्यक्ती अजूनही कोरोना लसीच्या लाभापासून वंचित आहेत.
कासोदा,आडगाव,फरकांडे,बांभोरी,वनकोठे,नांदखुर्दे(खुर्द व बुद्रुक) या परीसरात विनालस नागरीकांची संख्या १६हजार इतकी आहे.रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेञातील गावांमधील १७ हजार दोनशे पंचावन्न नागरीकांनी अद्याप लस घेतलेली नाही. तळई, उञाण परीसरातील ८हजार आठशे एक्कावन्न इतके नागरीक विनाडोस चे आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात एकूण २१ लसीकरण केंद्रे आहेत तर एरंडोल येथे नगरपालिकेच्या सभागृहात लसीचा डोस देण्याचे कामकाज सूरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.