Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple Watch Ultra Vs Samsung Galaxy Ultra: ॲप्पलला टक्कर देण्यासाठी सॅमसंगचे नवीन स्मार्टवॉच मैदानात, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

11

Apple Watch Ultra Vs Samsung Galaxy Ultra: ॲप्पलच्या लोकप्रिय अल्ट्रा वॉच सिरीजशी स्पर्धा करण्यासाठी सॅमसंगने त्यांचे नवीन घड्याळ Galaxy Ultra लाँच केले आहे. भारतात या घड्याळाची किंमत 6 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत गॅलेक्सी वॉच अल्ट्रा ॲप्पल वॉच अल्ट्राला टक्कर देऊ शकेल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Apple वॉच अल्ट्रा Appleने सुमारे एक वर्षापूर्वी 23 सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च केले होते. आज या स्मार्टवॉचची किंमत सुमारे 90 हजार रुपये आहे. याला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने गॅलेक्सी वॉच अल्ट्रा लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्राची किंमत ॲप्पलच्या वॉचच्या जवळपास निम्मी आहे. ॲप्पल वॉच अल्ट्राची किंमत 90 हजार रुपये आहे, तर गॅलेक्सी वॉच अल्ट्रा स्मार्टवॉचची किंमत जवळपास 60 हजार रुपये आहे.

या दोन्हीही दर्जेदार स्मार्टवॉचेसची तुलना

डिस्प्ले साइज – Galaxy Watch Ultra 47mm: 1.5 इंच स्क्रीन आकारात येतो, तर Apple Watch Ultra 49mm: 1.91 इंच स्क्रीन आकारात येतो.
डिस्प्ले रिझोल्यूशन – गॅलेक्सी वॉच अल्ट्राचे रिझोल्यूशन 480×480 पिक्सेल आहे, तर ऍपल वॉचमध्ये 502×410 पिक्सेलचे रिझोल्यूशन थोडे जास्त आहे.
डायमेंशन – जर आपण डायमेंशनबद्दल बोललो तर, गॅलेक्सी वॉचचे डायमेंशन 47.1×47.4×12.1 मिमी आहे, तर Apple वॉचचे डायमेंशन 49 x44x14.4 मिमी आहे.
प्रोसेसर – Galaxy Watch Ultra मध्ये Samsung इन-हाउस Exynos W1000 चिपसेट आहे. त्याचप्रमाणे ॲप्पल वॉच अल्ट्रामध्ये ॲप्पल एस9 चिपसेट देण्यात आला आहे.
रॅम – गॅलेक्सी वॉचमध्ये 2 जीबी रॅम देण्यात आली आहे, तर ॲप्पलकडून फक्त 1 जीबी रॅम दिली जात आहे.
स्टोरेज – सॅमसंग 32 जीबी स्टोरेज देत आहे, जे 64 जीबी स्टोरेज असलेल्या Apple पेक्षा कमी आहे.
वजन – सॅमसंग वॉचचे वजन 60.5 ग्रॅम आहे, तर Apple वॉच 61.5 ग्रॅम आहे.
बॅटरी – सॅमसंग अल्ट्रा स्मार्टवॉचमध्ये 590mAh बॅटरी आहे, तर Apple Watch मध्ये 564mAh बॅटरी आहे.
कलर ऑप्शन्स – सॅमसंग वॉच टायटॅनियम सिल्व्हर, टायटॅनियम ग्रे आणि टायटॅनियम व्हाईट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येते, तर ऍपल वॉच सिंगल टायटॅनियम कलर पर्यायामध्ये येते.
किंमत – सॅमसंग गॅलेक्सी अल्ट्रा स्मार्टवॉचची किंमत 60 हजार रुपये आहे, तर ॲपल वॉच अल्ट्राची किंमत सध्या सुमारे 90 हजार रुपये आहे, जी लॉन्चच्या वेळी 1 ते 1.25 लाख रुपये होती.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.