Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Boat Stone 352 Pro: न थांबता 12 तास चालेल पार्टी; बोटनं लाँच केले दमदार ब्लूटूथ स्पिकर, इतकी आहे किंमत
Boat Stone 352 Pro: बोटचा नवीन ब्लूटूथ स्पिकर भारतीय बाजारात स्टोन 352 नावाने सादर झाला आहे. यात RGB लाइट्ससह IPX5 रेटिंग मिळते. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा सिंगल चार्जमध्ये 12 तासांचा बॅकअप देऊ शकतो.
बोट स्टोन 352 प्रो ची किंमत
Boat Stone 352 Pro पोर्टेबल स्पिकर भारतात 1799 रुपयांमध्ये येतो. पोर्टेबल स्पिकर Boat च्या अधिकृत वेबसाइटवरून विकत घेता येईल. हा Amazon वरून देखील विकत घेता येईल. हा रेजिंग ब्लॅक, ग्रूव्ही ग्रे, आणि वयंबिंग ब्लू कलर्समध्ये लाँच करण्यात आला आहे.
Tecno Spark 20 Pro 5G: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम असलेला फोन 14 हजारांत; सोबत 108MP चा कॅमेरा
बोटच्या नवीन ब्लूटूथ स्पीकरचे फीचर्स
Boat Stone 352 Pro मध्ये 14W RMS आउटपुट देण्यात आला आहे. यात बोट सिग्नेचर साउंड टेक्नॉलॉजी आहे. कंपनीनुसार, हा बॅलेन्स्ड ऑडियो, डीप बेसमुळे युजरला रिच साउंड एक्सपीरियंस देऊ शकतो. स्पिकरचे वजन 600 ग्राम आहे. RGB लाइट्स सपोर्ट देखील या स्पिकरमध्ये देण्यात आला आहे. या लाइट्स म्यूजिक प्ले दरम्यान रंग बदलू शकतात त्यामुळे पार्टीची माहौल कायम राहतो.
कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ सपोर्ट आहे. डिवाइस यासाठी Bluetooth 5.3 व्हर्जनसह सादर करण्यात आला आहे. यात ट्रू वायरलेस स्टीरियो फंक्शन आहे ज्यामुळे यात दोन स्पिकर पेअर केले जाऊ शकतात. यात मल्टीपल पोर्ट देण्यात आले आहेत ज्यात USB, AUX, आणि TF कार्ड स्लॉट देखील आहे. स्पिकरमध्ये बिल्ट-इन मायक्रोफोन आहे ज्यामुळे हा हँड्स फ्री कॉलसाठी देखील वापरता येतो.
Stone 352 Pro ला कंपनीनं IPX5 रेटिंग दिली आहे जेणेकरून पाण्याच्या शिंतोड्यांचा यावर काहीही परिणाम होत नाही. आउटडोर मध्ये देखील याचा वापर केला जाऊ शकतो. स्पिकरची बॅटरी लाइफ पाहता हा सिंगल चार्जमध्ये 12 तासांचा बॅकअप देऊ शकतो. चार्जिंगसाठी यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.