Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Redmi K70 Ultra लवकरच चीनमध्ये सादर केला जाईल. या फोनमध्ये 24GB रॅम आणि 1TB ची जबरदस्त स्टोरेज मिळेल. तसेच Ice Glass कलर व्हेरिएंटमध्ये येणारा फोन 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. भारतीय बाजारात हा हँडसेट रीब्रँड होऊन येण्याची शक्यता आहे.

रेडमी के70 अल्ट्राच्या लाँचसाठी खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. फोनच्या लाँच पूर्वीच शाओमीनं एक घोषणा केली आहे, त्यानुसार रेडमी के70 अल्ट्राचा 24GB रॅम व्हेरिएंट देखील बाजारात येईल. मीडिया रिपोर्टनुसार, या फोनमध्ये 1TB स्टोरेज स्पेस कंपनी देईल. Weibo वर शाओमीचे अधिकारी Wang Teng यांनी अलीकडेच ऑनलाइन प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं आहे फोनचा 24GB रॅम व 1TB (1024GB) स्टोरेज व्हेरिएंट देखील लाँच होईल.Tecno Spark 20 Pro 5G: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम असलेला फोन 14 हजारांत; सोबत 108MP चा कॅमेरा
रेडमी के70 अल्ट्रा या महिन्यात लाँच होणार आहे, ज्याची अधिकृत तारीख लवकरच घोषित केली जाऊ शकते. फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ चिपसेट असेल. इतकेच नव्हे तर हा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात नवीन जेनरेशनचा 1.5K C8+ स्ट्रेट डिस्प्ले दिला जाईल. डिस्प्लेमध्ये नॅरो बेजल्स मिळतील. फोनच्या मागे 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS) चा सपोर्ट असेल.
Redmi K70 Ultra चा Ice Glass कलर व्हेरिएंट देखील कंपनी लाँच करेल. फोनमध्ये खास कूलिंग सिस्टम मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये युजर्सना बेस्ट गेमिंग एक्सपीरियंस मिळू शकतो. सांगण्यात आले आहे की परफॉर्मन्स बेंचमार्क, फ्रेम रेट आणि रिजॉल्यूशन लेव्हलवर हा बेस्ट गेमिंग फोन असेल. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. स्मार्टफोनमध्ये 5500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील या डिव्हाइस मध्ये मिळू शकतो.