Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 13 जुलै 2024: या राशींसाठी ताणतणाव वाढविणारा ‘शनिवार’ ! गुप्त शत्रू सक्रिय होतायेत,सावध राहा ! पाहा तुमचे राशिभविष्य

14

Aaj che Aarthik Rashi Bhavishya 13 July 2024 :
शनिवार 13 जुलै रोजी मंगळाच्या संक्रमणामुळे मंगळ आणि शनि यांच्यामध्ये चतुर्थ दशम योग तयार झाला आहे. मंगळ आणि शनि हे दोन्ही क्रूर स्वभावाचे मानले जातात. या दोघांच्या विनाशकारी संयोगाचा त्रास सिंह आणि कुंभ राशीसह 5 राशींवर होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी सावध रहावे आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट पाहून घ्यावीत. कामाते अडथळे येतील पण तुम्ही फोकस राहा. या राशीच्या लोकांना व्यापारात यश मिळेल.मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी शनिवार आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत कसा राहील ते पाहूया.

मेष आर्थिक राशिभविष्य : पुण्यकार्यात पैसे खर्च होतील

मेष राशीच्या लोकांना भाग्यवृद्धीचा दिवस आहे आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि नशिबाची साथ राहील. वृद्धांची सेवा आणि पुण्याकार्यात पैसे खर्च होतील, त्यामुळे मनात आनंद होईल. विरोधकांसाठी तुम्ही डोकेदुखी ठराल. वैवाहिक जीवनात शुख, शांती राहील आणि तुम्हाला सन्मान प्राप्तीमुळे मनात आनंद होईल.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : फायदा, तोट्याचा नीट विचार करा

वृषभ आर्थिक राशिभविष्य : फायदा, तोट्याचा नीट विचार करा

वृषभ राशीच्या लोकांना आज यशाचा दिवस आहे आणि आज तुम्ही विरोधकांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रय्तन कराल. आज तुम्हाला चांगले लाभ होतील आणि प्रयत्नांत यश हेईल. हळूहळू तुमची पाऊल यशाच्या दिशेने पडेल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी फायदा, तोटा यांचा नीट विचार करावा. दिवसा काम वेळेवर संपवून कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतित करा.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : संततीकडून आनंदाची बातमी

मिथुन आर्थिक राशिभविष्य : संततीकडून आनंदाची बातमी

मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस सामान्य राहील आणि तुमच्यासाठी यशाचे योग आहेत. तुम्हाला बौद्धिक आणि व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात नव्या कल्पनांवर काम कराल, त्यातून लाभ होतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल, त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. भाग्योदयचा दिवस आहे, या दिवसाचा लाभ उठवा आणि कामावर लक्ष केंद्रित करा.

कर्क आर्थिक राशिभविष्य : निर्णय लाभप्रद ठरतील

कर्क आर्थिक राशिभविष्य :  निर्णय लाभप्रद ठरतील

कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभाचा आहे आणि तुम्ही घेतलेले निर्णय लाभाप्रद ठरतील. आज तुमचा जनसंपर्क वाढेल आणि मन प्रफुल्लित होईल. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. धनवृद्धी होईल आणि रखडलेली कामे पूर्ण झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नशिबाची साथ मिळेल.

सिंह आर्थिक राशिभविष्य : कटुता संपेल

सिंह आर्थिक राशिभविष्य : कटुता संपेल

सिंह राशीला प्रत्येक बाबातीत नशिबाची साथ मिळेल. विरोधकांचे षड़यंत्र अयशस्वी होतील. कौटुंबीक सुखभोगांच्या साधनात वाढ होईल. शुभ खर्च झाल्याने मनात आनंद राहील. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली कटुता आपापसांतील समजुतीने समाप्त होईल. नवीन ओळखीचे रुपांतर मैत्रीत होईल. धनवृद्धी होईल आणि तुमची कामे संपन्न होतील.

कन्या आर्थिक राशिभविष्य : ताणतणाव वाढविणारा दिवस

कन्या आर्थिक राशिभविष्य : ताणतणाव वाढविणारा दिवस

कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस आव्हानात्मक राहील. तुमच्यासमोर बऱ्याच जबाबदाऱ्या असतील, त्या पूर्ण केल्याने लाभ होतील. आज एखादे नियोजन करण्यात पूर्ण दिवस जाईल. नियोजनात तुमचा हात कोणी पकडू शकत नाही. सर्व प्रकारच्या अपेक्षांना पात्र ठरण्याची तुमची विशेषता आज तुम्हाला यश देईल.

तुळ आर्थिक राशिभविष्य : गुप्त शत्रू सक्रिय होतील

तुळ आर्थिक राशिभविष्य : गुप्त शत्रू सक्रिय होतील

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभाचा राहील आणि काही विशेष निर्णय तुम्हाला लाभप्रद ठरू शकतात. कष्ट केल्याने तुम्हाला यश मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल. गुप्त शत्रू सक्रिय होतील आणि तुम्हाला अनावश्यक धावपळ करावी लागेल, त्यामुळे कुटुंबात अशांती राहील. सूर्यास्तावेळी दिलासा मिळेल. आज धनवृद्धी होईल आणि कुटुंबाचा वेळ आनंदात जाईल.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : आव्हानात्मक दिवस

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : आव्हानात्मक दिवस

वृश्चिक राशीच्या लोकांना दिवस आव्हानात्मक राहील. काही महत्त्वाचे व्यवहार तुमच्या बाजूने निश्चित होतील. जर तुम्ही तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकला तर आगामी काळात वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. तुम्हाला व्यापारात लाभ होतील आणि योजना यशस्वी होतील. भाग्यवृद्धीचा दिवस आहे.

धनू आर्थिक राशिभविष्य : योजना पूर्ण होतील

धनू आर्थिक राशिभविष्य : योजना पूर्ण होतील

धनू राशीच्या लोकांना आजचा दिवस यशाचा राहील. घरी धनधान्यात वृद्धी होईल आणि मित्रांकडून धनलाभ होईल. शत्रूवर विजय प्राप्त कराल आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. रात्री शुभव्यय आणि मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यापारात लाभ होतील, आणि तुमच्या योजना पूर्ण होतील.

मकर आर्थिक राशिभविष्य : व्यापारात यश मिळेल

मकर आर्थिक राशिभविष्य : व्यापारात यश मिळेल

मकर राशीच्या लोकांना धनवृद्धी होईल आणि तुम्हाला विजय मिळेल. सत्पुरुषांची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. उच्चाधिकाऱ्यांच्या कृपेने जमीन, संपत्तीसंबंधीचे वाद मार्गी लागतील. सायंकाळी प्रकृती थोडी नाजुक राहील, त्याकडे लक्ष द्यावे. व्यापारात यश मिळेल आणि गुंतवणुकीतून लाभ होतील.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : मतभेद आणि राग टाळा

कुंभ आर्थिक राशिभविष्य : मतभेद आणि राग टाळा

कुंभ राशीच्या लोकांना लाभ होतील आणि धनवृद्धी होईल. कर्म, फलप्राप्ती अशा विषयांत लाभ होईल. कोठून तरी सहजरीत्या पैसे मिळण्याचे योग आङे. एखाद्या वृद्ध महिलेच्या आशीर्वादाने प्रगतीची विशेष संधी मिळेल. भावबहिणींत काही कारणाने वाद होऊ शकतो. मतभेद, राग टाळा. तुम्हाला व्यापारात यश प्राप्त होईल.

मीन आर्थिक राशिभविष्य : विशेष लाभाचा दिवस

मीन आर्थिक राशिभविष्य : विशेष लाभाचा दिवस

मीन राशीच्या लोकांना विशेष लाभाचा दिवस आहे. धनवृद्धी होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत समोर येतील. विरोधक पराजित होतील. आज तुमच्या नशिबाला झळाळी मिळेल. व्यवसायात जास्त पैसे गुंतवणे लाभदायक ठरेल. आज तुम्ही कुटुंबातील लोकांसमवेत फिरायला जाण्याचे निश्चित कराल. तसेच आज तुम्हाला लाभ होतील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.