Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
हिड अॅण्ड रन गुन्हयातील आरोपींस गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद ..
गंगापु(नाशिक शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
गंगापुर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील रानवारा हॉटेल, बारदान फाटा ते ध्रुवनगरकडे जाणा-या रोडवर सौ. अर्चना किशोर शिंदे वय – ३१ वर्षे रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापुर रोड, नाशिक हया पायी जात असतांना पाठीमागुन आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक मारुन सदरील वाहनावरील वाहन चालक
त्याठिकाणी न थांबता पळुन गेला होता त्याबाबत पोलिस ठाणे येथे माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे तसेच पोलिस पथक असे तात्काळ पोहचले व नमुद जखमी महिलेस उपचारार्थ सिव्हील हॉस्पीटल, नाशिक येथे दाखल केले असता नमुद महिला सौ. अर्चना किशोर शिंदे वय – ३१ वर्षे रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापुर रोड, नाशिक हि मयत झाल्याचे वैदयकीय अधिकारी यांनी घोषीत केले.
यावरुन गंगापुर पोलिस स्टेशन येथे नोंद असलेला गुरनं. १६७ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०५(१),२८१ सह मोवाका १८४,१८५, १३४ प्रमाणे दिनांक १०/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल असुन तेव्हा नमुद घटनास्थळी पळुन गेलेल्या वाहनाची माहिती घेतली असता तेथे नमुद काही इसमांनी वाहनाचा क्रमांक एमएच- ०३ – बीई -६६३४ हा असल्याचे सांगितले. तेव्हा गंगापुर पोलिस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी नमुद वाहनाची माहिती काढुन सदर वाहन देवचंद रामु तिदमे रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, नाशिक यांचे मालकीची असल्याचे समजुन आले. तेव्हा नमुद पत्यावर जावुन देवचंद तिदमे याचा शोध घेतला असता
तो त्याठिकाणी राहत नसल्याची माहिती समजली. तेव्हा गुप्तबातमीदारांना सदर वाहनाची व इसमाची माहिती देवुन
त्याचा शोध घेण्यास कळविले असता सदरचा इसम हा कृष्णा रेसीडेन्सी, फलॅट नं. ४, ध्रुवनगर, नाशिक येथे राहत असल्याचे समजुन आले. तेव्हा लागलीच त्याचे नमुद पत्यावर जावुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरवेळी नमुद इसमाने मद्य सेवन केले असल्याचे दिसुन येत असल्याने त्याची वैदयकीय अधिकारी सिव्हील हॉस्पीटल, नाशिक यांचेकडुन वैदयकीय तपासणी करुन त्याचे रक्ताचे सॅम्पल फॉरेन्सिक तपासणीकरिता घेण्यात आले आहे. तसेच नमुद आरोपी देवचंद रामु तिदमे वय ५१ वर्षे रा. फलॅट नं. ४, कृष्णा रेसीडेन्सी,,
ध्रुवनगर, गंगापुर शिवार, नाशिक यांस नमुद गुन्हयात अटक करुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. सोमनाथ गेंजे हे करित आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त, परि-१, किरणकुमार चव्हाण सहा. पोलिस आयुक्त, सरकारवाडा विभाग सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शना खाली गंगापुर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहा. पोलिस
निरीक्षक सोमनाथ गेंजे, पोलिस उप निरीक्षक मोतीलाल पाटील, पोहवा. रामदास चौधरी, रविंद्र मोहिते, नापोशि .विनायक आव्हाड, पोशि रमेश गोसावी, दळवी, नवले, हरिष चौरे,प्रकाश राउत सर्व नेमणुक गंगापुर पोलिस स्टेशन यांनी केली आहे.
तसेच यापूर्वी गंगापुर पोलीस ठाणेकडुन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वेळोवेळी प्रयत्न करण्यात येत असुन १ जुलै ते आजपावेतो एकुण ०३ ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत.