Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Hand Impressions on Walls :
भारतीय संस्कृतीत अशा वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात ज्या बऱ्याच वेळा विचित्र आणि अनावश्यकही वाटतात. पण या सर्व परंपरांचे धार्मिक महत्त्व आणि लाभ आहेत. अशा प्रकारची एक प्रथा जी विविध ठिकाणी पाळली जाते ती म्हणजे हळदी किंवा लाल रंगाने भिंतीवर हातांचा ठसा उमटवणे. याला मंगलमय आणि शुभ मानले जाते, तसेच याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.
भिंतीवर हातांचे ठसे का उमटवले जातात?
भिंतीवर जे हातांचे ठसे उमटवले जातात, त्याला ‘पंचशूलक’ असे म्हटले जाते. हाताची पाचही बोटं ही पाच देवांची, पाच इंद्रियांची आणि पाच तत्त्वांची प्रतीक आहेत. पंचशूलम माता लक्ष्मी आणि बृहस्पतीचे शुभ प्रतीक मानले जाते. दारावर हाताचा ठसा उमटवण्याचा उद्देश हाच असतो की घरी माता लक्ष्मी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन यावी आणि बृहस्पतीने घरातील सर्व रोग आणि कष्ट यांचा पराभव करावा. हळदीने पंजाचा छाप उमटवणे नकारात्मक शक्तींना दारावरच रोखून धरतो आणि त्यांना घरी प्रवेश करू देत नाही. पंजाचा ठसा वास्तुदोष दूर करण्यासाठी केला जातो. यामुळे घरी सकारात्मक ऊर्जा संचार करते. असे सांगितले जाते हे निशाण पाहून देवदेवात घरी प्रवेश करतात आणि घरातील सर्व दुःख, कष्ट दूर होतात.
नववधू जेव्हा घरी प्रवेश करते तेव्हा, तिच्या हातांवर हळद लावून तिच्या हाताने असे ठसे उमटवले जातात. वर सांगितल्या प्रमाणे हे ठसे बृहस्पतीचे शुभ प्रतीक मानले जाते, आणि बृस्पतीचा थेट संबंध सुखी वैवाहिक जीवनाशी आहे. अशी चिन्हं बनवल्याने नवदांपत्यांच्या जीवनात सुखशांती राहाते आणि वैवाहिक जीवन आनंदी होते. इतर मान्यता जर पाहिल्या तर नववधू लक्ष्मीचे रूप असेत, तर हळह भगवान विष्णूला प्रिय आहे. त्यामुळे नववधूच्या हाताला हळद लावून त्याचा ठसा जेव्हा उमटवला जातो, तेव्हा माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूही घरात प्रवेश करतात, अशी मान्यता आहे.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.