Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Hit and Run Case: मुंबई हिट अँड रनची पुनरावृत्ती; कारनं वृद्धाला उडवलं, २ किमी फरफटत नेलं; थरकाप उडवणारा अपघात

12

राजकोट : मुंबईतील वरळी हिट अँड रन घटनेची पुनरावृत्ती गुजरातमध्ये पाहायला मिळाली. गुजरातमधील राजकोटच्या कलावद रोडवर ही घटना घडली आहे. वरळीमध्ये घडलेल्या बीएमडब्ल्यू कार अपघाताचा थरार पुन्हा पाहायला मिळाला आहे. गुरुवारी रात्री एर्टिगा कारने एका वृद्धाला उडवले आणि त्याला कारसोबत २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. ज्यामध्ये वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

थरकाप उडवणारा हा अपघात सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार केली आहेत. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कारच्या मालकाने आपल्या जावयाला कार चालवायला दिली होती, पण त्याच्याकडून हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Worli Hit & Run: क्रूरतेनंतर आता मिहीरला पश्चाताप, अपघाताचे CCTV बघताच म्हणाला…
भरधाव कारने रस्त्यावरील वृद्धाला धडक दिली आणि क्षणांत होत्याचे नव्हते झाले, वृद्धाचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान मुंबईत देखील एक विवाहित महिला हिट अँड रनची शिकार ठरली. शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर शहा याच्या बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकीवरील कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले होते. या घटनेने कावेरी यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Worli Hit & Run: अनेकांनी हात दाखवूनही तो थांबला नाही, वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील धक्कादायक सत्य
घटनेतील आरोपी मिहीर शहा सध्या पोलीस कस्टडीत असून पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या पुराव्यानुसार, अपघात घडताच कावेरी नाखवा या कारच्या बोनेटवर धडकल्या होत्या. एवढे घडूनही मिहीरने कार थांबवली नाही आणि कावेरींना वरळी सी-लिंकच्या दिशेने १.५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले आणि नंतर कारमधून उतरत कावेरींना तशाच अवस्थेत सोडून तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी तपासकार्य सुरु केले आणि तीन दिवसांत मिहीर शहासह १२ जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये मिहीर शहाचे वडील, आई आणि त्याच्या दोन बहिणींचा देखील समावेश आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.