Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Airtel 11 Rs Data Plan: फक्त 11 रुपयांमध्ये अनलिमिटेड डेटा देत आहे एअरटेल, 100 रुपयांच्या आत तीन प्लॅनमध्ये जबरदस्त फायदे
Airtel 11 Rs Data Plan: 4G युजर्ससाठी एअरटेलने काही प्लॅन्स सादर केले आहेत जे 100 रुपयांच्या आत येऊन देखील अमर्याद डेटा देत आहेत. यातील सर्वात स्वस्त प्लॅन 11 रुपयांचा आहे. चला जाणून घेऊया या प्लॅन्सची माहिती.
11 रुपयांचा एअरटेलचा प्लॅन
एअरटेलचा 11 रुपयांचा प्लॅन एक तासासाठी अनलिमिटेड डेटाचा फायदा देतो. त्यामुळे जर तुम्हाला अचानक जास्त डेटाची गरज पडली तर या प्लॅनने रीचार्ज करणे बेस्ट ठरेल. परंतु, या प्लॅनमध्ये 10GB FUP (फेयर युजेस पॉलिसी) लिमिट लागू होते. म्हणजे एका तासात 10 जीबी पेक्षा जास्त डेटा वापरता येत नाही.
49 रुपयांचा एअरटेलचा प्लॅन
संपूर्ण दिवसभर अनलिमिटेड डेटा वापरायचा असेल तर या प्लॅनची निवड करता येईल. हा प्लॅन दिवभराच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड डेटाचे बेनिफिट देतो. लक्षात असू द्या की यात देखील 20GB ची FUP (फेयर युसेज पॉलिसी) लिमिट लागू होते.
99 रुपयांचा एअरटेलचा प्लॅन
एअरटेलचा 99 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन दोन दिवसांची व्हॅलिडिटी देतो. या दोन दिवसांत ग्राहकांना अनलिमिटेड डेटा वापरता येईल. या प्लॅनसाठी देखील 20GB FUP (फेयर युसेज पॉलिसी) लिमिट आहे, हे लक्षात असू द्या.
लक्षात असू द्या हे सर्व प्लॅन्स डेटा-ओनली व्हाउचर्स आहेत म्हणजे की यात अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS सारखे बेनिफिट्स मिळत नाहीत. कोणत्याही अॅक्टिव्ह प्लॅनसह या प्लॅनचा रीचार्ज करू शकता आणि अनलिमिटेड डेटाचा लाभ घेता येईल. परंतु जर तुमच्याकडे अनलिमिटेड 5G डेटा देणारा प्लॅन असेल तर तुम्चाला या प्लॅनची अजिबात गरज नाही.
1200 शहरांमध्ये एअरटेल वाय-फाय
एअरटेल वाय-फाय सेवा भारतातील 1200 शहरांमध्ये पोहचली आहे. या निमित्ताने कंपनीनं ग्राहकांसाठी नव्या ऑफर्सची घोषणा केली आहे. आता वाय-फाय पिलांसोबत हजारो टीव्ही शो, चित्रपट आणि वेबसीरिज पाहता येतील. प्लॅनमध्ये 22पेक्षा जास्त ओटीटी आणि 350 ज्यास्त टीव्ही चॅनेल्स पाहता येतील. तसेच जेव्हा जेव्हा ग्राहक एखादी नवीन एअरटेल सेवा जोडतील मग ती मोबाइल असो, कन्टेन्ट असो किंवा वाय-फाय कंपनी बेसिक प्लॅनवर अतिरिक्त बेनिफिट देखील येईल.