Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Waterfall Incident: धबधब्यात पिकनिकचा आनंद, अचानक वाढला प्रवाह; पर्यटक अडकले, मदतीसाठी आक्रोश सुरु अन् मग…

29

पाटणा : पावसाळी पर्यटन धोक्याचे ठरत असून सुद्धा पर्यटक काही धबधब्याकडे वळताना स्वत:ला रोखू शकत नाहीत. गेल्या काही दिवसांत धबधब्यात जीव गमावलेल्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच आता बिहारमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील एका धबधब्यावर पिकनिक एन्जॉय करण्यासाठी गेलेले बरेचसे लोक पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या मध्यात अडकले. घटना घडताच नजीकच्या वन विभागाच्या टीमला पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत लोकांना वाचवले आहे.

वनविभाग टीमने वाचवले पर्यटकांचे प्राण

वनविभागाच्या टीमने मोठ्या दोरीच्या मदतीने पाण्यात फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढले आहे. यामुळे वन विभाग पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा विडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विजेच्या तारा शेतात कोसळल्या, दोन्ही सख्ख्या भावांचा शॉक लागून मृत्यू; मुलांना शोधण्यास वडील गेले अन् अनर्थ

पावसाचा जोर वाढल्याने धबधबा प्रवाहित

समोर आलेल्या माहितीनुसार, रोहतास जिल्ह्याच्या तिलौथू येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. हा धबधबा पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत असतात. दरम्यान तुतला भवानी धबधबा क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु होता. यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला. परिणामी पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे धबधब्यात उतरलेले पर्यटक तेथेच अडकले. एवढ्यात अडकलेले सगळे पर्यटक मदतीसाठी आक्रोश करु लागले. ज्याचा आवाज नजीकच्या लोकांना पोहोचला.
Ratnagiri Wall Collapse : मुसळधार पावसात DBJ कॉलेजची भिंत कोसळली, महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा चिरडून मृत्यू

पाण्यातून बाहेर पडताच पर्यटकांनी सोडला निश्वास

लोकांची आरडाओरड ऐकून या घटनेची नजीकच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि आपले बचावकार्य सुरु केले. वन विभागाच्या टीमने एका दोरीची मदत घेऊन पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. एकमेकांच्या हात पकडून एक साखळी तयार करण्यात आली आणि एक एक करुन सर्वांना बाहेर काढले. पाण्यामधून बाहेर येताच लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला पण त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.