Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

CMF Phone 1: हा फोन घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड! फक्त तीन तासांत 1 लाख युनिट्सची विक्री

11

CMF Phone 1: नथिंगच्या सबब्रँडच्या पहिल्या फोनचा सेल सुरु होताच पहिल्या 3 तासांत फोनचे 1 लाखांपेक्षा जास्त युनिट्स विकले गेले. हा फोन 6.67 इंच Super AMOLED डिस्प्ले, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरजेसह 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Nothing च्या सब-ब्रँड CMF नं आपला पहिला स्मार्टफोन CMF Phone 1 8 जुलैला लाँच केला होता. हा फोन कित्येक दिवस चर्चेचा विषय ठरला होता. आता कंपनीनं याच्या विक्रमी सेलची माहिती दिली आहे त्यानुसार, पहिल्या सेलमध्ये फोनचे लाखो यूनिट्स विकले गेल्याचा दावा कंपनीनं केला आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ Super AMOLED डिस्प्ले आहे. यात 2000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.

सीएमएफ फोन 1 12 जुलैला पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध झाला. पहिल्या सेलमध्ये काही तासांच्या आत लाखो युनिट्स विकले गेले असं कंपनीनं सांगितलं. Nothing नं ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट दिली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, सेल सुरु होताच पहिल्या 3 तासांत फोनचे 1 लाख पेक्षा जास्त यूनिट्स विकले गेले. सेल दुपारी 12 वाजता सुरु झाला होता.
Tecno Spark 20 Pro 5G: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम असलेला फोन 14 हजारांत; सोबत 108MP चा कॅमेरा

Nothing Phone (2a)च्या बाबतीत एवढे युनिट्स विकण्यासाठी कंपनीला 24 तास लागले होते. सेल सुरु होण्यापूर्वीच 1 तासांत फोनचे 60 हजार यूनिट्स विकले गेले होते. त्या तुलनेत CMF Phone 1 खरेदी करण्यात ग्राहकांना जास्त रस आहे आहे हे दिसून येते.

CMF Phone 1 काळ पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. फोनचा बेस 6 जीबी रॅम, 128 जीबी व्हेरिएंट 15,999 रुपयांमध्ये येतो. तसेच अ‍ॅक्सेसरीज पाहता याची केस 1499 रुपयांमध्ये येते. तर स्टॅन्ड, लॅनियार्ड आणि कार्ड केसची किंमत प्रत्येकी 799 रुपये आहे.

सेलच्या पहिल्या दिवशी फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनीनं बँक ऑफर्स दिल्या होत्या. ऑफर्सचा वापर करून फोनचा 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता आला. तर 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन खरेदीसाठी Flipkart सह प्रमुख ऑनलाइन रिटेलर्स व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

CMF Phone 1 भारतात 8 जुलैला लाँच झाला होता. हा फोन 6.67 इंचाचा Super AMOLED डिस्प्लेसह येतो ज्याचा रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल (FHD+) आहे. यात 120Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 2000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा मागे 50 मेगापिक्सल मेन कॅमेरासह आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. यात 5W रीवर्स चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा 8 जीबी पर्यंत रॅम, आणि 128 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेजसह येतो. स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. यात MediaTek Dimensity 7300 5G चिपसेट देण्यात आला आहे. फोन Android 14 आधारित Nothing OS 2.6 वर चालतो. फोनचे डायमेंशन 164.00 x 77.00 x 8.00mm आहेत आणि वजन 197.00 ग्राम आहे.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.