Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Odisha Governor Son : राज्यपालांच्या मुलाची ‘दादागिरी’, आलिशान गाडी न पाठवल्याने अधिकाऱ्याला केली बेदम मारहाण

14

भुवनेश्वर : ओडीशाचे राज्यपाल रघुबर दास यांच्या मुलाने त्याला घेण्यासाठी आलीशान गाडी न पाठवल्यामुळे अधिकाऱ्याला भेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
वैकुंठ प्रधान असे अधिकाऱ्याचे आहे. 7 जुलै रोजी राज्यपाल रघुबर दास यांचा मुलगा ललित कुमार आणि त्याच्यासह अन्य पाच जणांनी लाथा बुककयांनी मारहाण केल्याचा आरोप वैकुंठ प्रधान यांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

वैकुंठ प्रधान यांनी आपल्या तक्रारीत म्हंटलं आहे की, ”माझी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ओडीशा दौऱ्यानिमित्त 5 जुलै पासून राजभवन सचिवालयातील घरगुती विभागात सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 7 आणि 8 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा पार पडला. 7 जुलै च्या रात्री मी कार्यालयात बसलो असताना राज्यपालांच्या आचाऱ्याने माझ्या जवळ येऊन ललित यांना तुम्हाला भेटायचे आहे असा निरोप दिला. त्यानंतर मी भेटण्यासाठी ललितकडे गेलो. ललितने मला नेण्यासाठी आलीशान गाडी का पाठवली नाही? असं म्हणत त्याने मला मोठ्या प्रमाणात शिवीगाळ केली. मी विरोध केला तर माझ्या कानशिलात मारली. त्यानंतर मी तेथून बाहेर पडलो.आणि राजभवनातच लपून बसलो. नंतर सुरक्षा रक्षक येऊन मला पुन्हा घेऊन गेले. नंतर सुरक्षा रक्षक व ललितने मिळून मला बेदम मारहाण केली”.

तक्रार नोंदवून घेण्यास नकार

वैकुंठ प्रधान यांच्या पत्नीने याबाबतची अधिक माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की,”घटनेनंतर दुसऱ्या दिवशी प्रधान सचिवांना घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती देण्यात आली. तसेच पोलिसांकडे देखील तक्रार नोंदवण्यासाठी गेलो. मात्र आमची तक्रार दाखल करून घेतली नाही”.

Assembly By Elections Result : सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश, भाजपला मोठा झटका

मुलाची सेवा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

वैकुंठ प्रधान यांच्या पत्नी पुढे म्हणाल्या की, ”माझे पती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची नियुक्ती राजभवनात सेवा देण्यासाठी करण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या मुलाला सेवा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा प्रकार आम्ही राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. परंतु त्यांनी माझ्या पतीलाच खडेबोल सुनावले. माझ्या पतीने 20 वर्षे हवाईदलात सेवा केली असून त्यांची 2019 पासून राजभावनात नियुक्ती झाली होती”.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे विरोधकांकडून राज्यपाल आणि त्यांच्या मुलावर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे राज्यपालांच्या मुलावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्षं लागले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.