Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WhatsApp Feature: व्हॉट्सॲपच्या या नवीन फिचरच्या मदतीने सहज करता येईल इंग्रजीत चॅट, गुगल ट्रांसलेटच्या मदतीने करेल काम

9

WhatsApp Feature : तुम्ही जर WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विशेषतः त्या युजर्ससाठी ज्यांना इंग्रजी लिहिण्यात आणि बोलण्यात मदत हवी आहे. वास्तविक, आता तुम्ही थेट WhatsApp वरून मेसेजची भाषा बदलू शकाल. याचा अर्थ, तुम्ही तुमच्या स्थानिक भाषेत लिहाल, जे आपोआप इंग्रजी भाषेत ट्रांसलेट होईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
WhatsApp या ॲप्समध्ये मेसेज ट्रान्सलेशनची सुविधा देत आहे. याचा अर्थ तुम्हाला इंग्रजी किंवा इतर कोणतीही भाषा येत नसली तरीही तुम्ही इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेत आरामात तुम्ही चॅट करू शकाल. सध्या हे फिचर टेस्टिंग फेजमध्ये आहे. Android बीटा व्हर्जन 2.24.15.8 इंग्रजी आणि हिंदीमध्ये थेट ट्रान्सलेशन ऑफर करत आहे. आशा आहे की लवकरच हे फिचर अधिकाधिक भाषांना सपोर्ट करेल.

मेसेजिंग आणि कॉलिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही

युजर्सना इतर कोणत्याही भाषेत चॅट करण्यासाठी Google Translate चा वापर करावा लागतो. मात्र, असे असूनही फोन करण्यात अडचण येत होती. मात्र आता मोबाईल ॲपमध्ये ही सुविधा दिली जात आहे. WABetaInfo वेबसाइटवरून ही माहिती देण्यात आली आहे. यासाठी Google Live Translate तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. ही सेवा वापरण्यासाठी, WhatsApp युजर्सना सुरुवातीला लँग्वेज पॅक डाउनलोड करावा लागेल, जो इंग्रजी आणि हिंदीला सपोर्ट करेल.

नवीन फीचर्स कधी लाँच होतील?

WhatsApp मध्ये संदेश भाषांतराव्यतिरिक्त व्हॉइस मेसेज ट्रान्स्क्राइब करण्याची सुविधा दिली जाऊ शकते. हे युजर्सना व्हॉइस मेसेजेसना टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्यास परवानगी देईल. हे व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्शन फीचर WhatsApp फॉर अँड्रॉइड ॲपच्या बीटा व्हर्जन 2.24.15.5 मध्ये दिसले आहे, रिपोर्टनुसार, हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही दोन्ही वैशिष्ट्ये सध्या चाचणी टप्प्यात आहेत, जी लवकरच युजर्ससाठी आणली जाऊ शकतात. मात्र, लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सध्या आपल्याला थोडी वाट पहावी लागेल

WhatsApp चे नवीन भाषांतर वैशिष्ट्य सध्या डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे आणि त्याचा प्रवेश बीटा टेस्टर्स देखील देण्यात आलेला नाही. म्हणजेच बीटा युजर्स देखील ते वापरू शकत नाहीत. त्याची टेस्टिंग पुढील काही आठवड्यांत सुरू होईल.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.