Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Zomato: “बायको रंगे हात पकडते म्हणून बाहेरून जेवण ऑर्डर करत नाही”; अॅप सोडून जाणाऱ्या युजरला सीईओने दिले उत्तर
Zomato Delete Order History Feature: झोमॅटोनं ऑर्डर हिस्टरी डिलीट करण्याचं फिचर सादर केलं आहे. हे फिचर सादर करण्यामागे असलेले सीईओ दीपेंदर गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितलं.
झोमॅटोचे सीईओ दीपेंदर गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी अॅपवर ऑर्डर हिस्ट्री डिलीट करण्याचं फीचर लाँच केल्याची माहिती दिली. दीपेंदर गोयल यांनी या अॅप फीचरच्या पोस्टमध्ये एक युजर ‘करण’ याची पोस्ट देखील जोडली आहे. गोयल यांनी लिहलं आहे की, “करण आणि त्याच्यासारख्या इतर अनेक आणि युजर्ससाठी- आता तुम्ही झोमॅटोवर आपल्या ऑर्डर हिस्ट्रीमधून ऑर्डर्स डिलीट करू शकता. याचा वापर सांभाळून करा. हे फिचर आणण्यासाठी वेळ लागला याचा आम्हाला खेड आहे. यामुळे अनेक सिस्टम आणि मायक्रोसर्व्हिसेजवर परिणाम झाला आहे. आम्ही हे फिचर सर्व कस्टमर्ससाठी रोल आउट करत आहोत.”
फीचरची घोषणा करताना दीपेंदर गोयल यांनी डिसेंबर 2023 च्या करण नावाच्या X युजरची एक पोस्ट कोट केली आहे. युजरनं ह्या पोस्टमध्ये दावा केला होता की तो आता झोमॅटोवरून रात्री उशिरा ऑर्डर्स करणार नाही कारण त्याची पत्नी या ऑर्डर्स चेक करते आणि तो या ऑर्डर्स हिस्ट्री मधून डिलीट देखील करू शकत नाही. युजरनं म्हटलं होतं की झोमॅटो हिस्ट्रीमधून ऑर्डर्स डिलीट करण्याचा पर्याय द्यावा नाही तर तो झोमॅटो सोडेल.”
जवळपास 7 महिन्यांनी आता झोमॅटोनं हे फीचर सादर केलं आहे. दीपेंदर गोयलच्या या पोस्टवर युजर्सच्या अनेक रिअॅक्शन आल्या आहेत.