Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Xiaomi 15 Pro: शाओमीचा सर्वात शाक्तशाली फोन देईल आयफोनला टक्कर; मिळेल DSLR सारखा कॅमेरा

10

Xiaomi 15 Pro च्या कॅमेऱ्याची माहिती समोर आली आहे. हा शाओमीचा आगामी फ्लॅगशिप डिवाइस असेल. ज्यात OV50K प्रायमरी सेन्सर म्हणून वापरला जाईल. स्मार्टफोनच्या मागे तीन 50 मेगापिक्सलचे कॅमेरे असतील.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शाओमी १५ प्रो
शाओमी आपल्या आगामी Xiaomi 15 सीरीजवर काम करत आहे जी यावर्षी ऑक्टोबरमध्ये चीनी बाजारात लाँच केली जाईल. लाँच पूर्वीच स्मार्टफोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. Xiaomi 15 Pro च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया शाओमी 15 सीरीज बाबत सविस्तर.

लीकनुसार, स्मार्टफोनच्या मागे तीन 50 मेगापिक्सलचे कॅमेरे असतील. प्रायमरी कॅमेरा f/1.4-f/2.5 व्हेरिएबल अपर्चरसह येईल. जो Xiaomi 14 Pro मधील f/1.4-f/4.0 व्हेरिएबल अपर्चरपेक्षा वेगळा आहे. याचा अर्थ असा की अपर्चर तितका बंद होणार नाही जितका आधी होत होता. याआधी आलेल्या माहितीनुसार, 15 Pro च्या कॅमेरा सिस्टममध्ये एक पेरिस्कोप टेलीफोटोचा समवेश केला जाईल. तसेच 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील असेल. कथितरित्या टेलीफोटो लेन्स लाइट इंटेक याच्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत चांगला झाला आहे, ज्यामुळे टेलीफोटो लेन्सची इमेज क्वॉलिटी सुधारणे अपेक्षित आहे.
itel Color Pro 5G: एकच नंबर! 12 जीबी रॅम असलेला 5G फोन आला 10 हजारांत; प्रोसेसर आहे तगडा

Xiaomi 15 Pro मध्ये OV50K चा वापर प्रायमरी सेन्सर म्हणून केलं जाईल. हा ओमनीव्हिजन सीरिजचा सर्वात पावरफुल इमेज सेन्सर आहे आणि याची डायनॅमिक रेंज खूप चांगली आहे. OV50K इमेज सेन्सर 1.2-मायक्रॉन पिक्सल साइज आणि 1/1.3″ ची सेन्सर साइज देतो. यात हाय हाई गेन आणि कोरिलेटेड मल्टी-सॅम्पलिंग (CMS) फंक्शन देखील आहे, जो लो लाइट कंडीशनमध्ये मदत करतो. हा 120fps आउटपुट आणि एचडीआर मध्ये 60 fps ला सपोर्ट करतो. फोन व्हेरिएबल अपर्चरला सपोर्ट करतो, ज्यामुळे परिस्थितीनुसार लाइट इंटेक अ‍ॅडजस्ट करता येतो.

पेरिस्कोप टेलीफोटोमध्ये Sony IMX8 सीरीज सेन्सरचा वापर केला जाईल आणि जो 5x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे Xiaomi 15 Pro देखील Leica Summilux लेन्ससह येईल. या ऑप्टिकल सॉल्युशनमुळे मिळणाऱ्या फोटोची क्लियरिटी चांगली असण्याची शक्यता जास्त आहे.

शाओमी 15 प्रो मध्ये 6.73 इंचाचा 2K डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यात 5,400mAh ची दमदार बॅटरी मिळू शकते. जी 120W वायर्ड आणि 80W वायरलेस फास्ट चार्जिंग मिळू शकते. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 4 चिपसेट दिला जाऊ शकतो. जोडीला 16GB LPDDR5x RAM मिळेल तर 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 7 सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर ड्युअल स्पिकर्स, IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स आणि अल्ट्रा सॉनिक सेन्सर मिळेल.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.