Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Offline UPI payment: तुम्हीही इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा युपीआय पेमेंट करू शकत नसाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तुम्ही इंटरनेटशिवायही व्यवहार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ही सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही.
अशा प्रकारे इंटरनेटशिवाय करा पेमेंट
- *99# ही USSD मोबाईल बँकिंग प्रणाली आहे जी तुम्हाला ऑफलाइन पेमेंट करण्याची संधी देते. तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या नंबरवरून तुमच्या स्मार्टफोनवर *99# डायल करा.
- आता स्क्रीनवर दर्शविलेल्या पर्यायांमधून 1 डायल करा. यानंतर, तुम्हाला ज्या UPI आयडीवर पैसे पाठवायचे आहेत त्याचे डिटेल्स टाका.
- हे केल्यानंतर, UPI पिन एंटर करा आणि सुरू ठेवा. पिन व्हेरिफिकेशननंतर तुम्ही तुमचे पेमेंट करू शकाल. लक्षात ठेवा की याद्वारे तुम्ही फक्त 5000 रुपये ट्रान्सफर करू शकता.
- यामध्ये तुम्हाला 13 भाषांचा पर्याय मिळेल. याद्वारे तुम्ही केवळ पेमेंटच करू शकता असे नाही तर तुमचा UPI पिन देखील बदलू शकता.
हे देखील करून पहा
- जर तुम्हाला वर नमूद केलेली प्रक्रिया करायची नसेल तर तुम्ही IVR नंबरद्वारे देखील UPI करू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त (6366 200 200) या नंबरवर कॉल करावा लागेल.
- यानंतर पे टू मर्चंट हा पर्याय निवडा,
- आता व्यापाऱ्याच्या डिव्हाइसवर (पीओडी) तुमच्या मोबाइल फोनवर क्लिक करा.
- फोन वाजल्यावर, # बटण दाबा, नंतर रक्कम आणि तुमचा UPI पिन एंटर करा.
- तुम्ही हे पेमेंट IVR कॉलद्वारे देखील व्हेरिफाय करू शकता.
वर नमूद केलेल्या दोन्ही प्रक्रिया फॉलो केल्यानंतर, तुम्ही ऑफलाइन व्यवहार करू शकता. तुम्ही तुमचे पेमेंट इंटरनेटशिवाय करू शकता.
UPI वर केलेल्या व्यवहारांवर शुल्क (MDR) आकारले जावे का?
सध्या जवळजवळ सर्व UPI पेमेंटसाठी व्यापारी सवलत दर (MDR) किंवा व्यवहार शुल्क आकारले जात नाही (PPI किंवा प्रीपेड साधनांद्वारे पेमेंट वगळून) कारण UPI चे कव्हरेज वाढवण्याचा आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते. परंतु अमेझॉन पे इंडियाचे सीईओ विकास बन्सल यांनी UPI व्यवहारांसाठी MDR ची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे छोट्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्यांना त्यांच्या मूल्याचा योग्य वाटा मिळेल. अशी कमेंट त्यांनी केली आहे.
2020 मध्ये UPI वरील MDR रद्द
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने 2020 मध्ये UPI वरील MDR रद्द केला होता. बँका आणि फिनटेक यांना त्यांच्या MDR तोट्याची भरपाई करण्यासाठी 2021 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात 1500 कोटींची योजना जाहीर करण्यात आली होती.