Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus Nord 4: काही मिनिटांत फुल चार्ज होईल हा वनप्लसचा फोन; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 100W फास्ट चार्जिंग

10

OnePlus Nord 4 भारतात याआधी आलेल्या OnePlus Nord 3 ची जागा घेईल. यात Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच मागे 50MP चा कॅमेरा मिळतो. हा फोन 100W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. चला जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
वनप्लस नॉर्ड ४
वनप्लस कंपनीनं आपल्या Summer Launch इव्हेंट दरम्यान अनेक डिवाइस लाँच केले आहेत. ज्यात OnePlus Nord 4, OnePlus Pad 2, OnePlus Buds 3 Pro आणि OnePlus Watch 2R चा समावेश आहे. बहुप्रतीक्षित मिडरेंज स्मार्टफोन OnePlus Nord 4 Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये 6.74 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. फोनमधील 5500mAh ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चला जाणून घेऊ फोनची किंमत आणि फीचर्स.

वनप्लस नॉर्ड 4 चे स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये 6.74 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेमध्ये 2,150 nits पीक ब्राइटनेस मिळते. तसेच, फोन Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरसह आला आहे, सोबत 12GB पर्यंत RAM मिळतो. तसेच, फोनमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज आहे. अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सिजन ओएससह आलेल्या या फोनला 4 वर्ष Android OS अपडेट मिळेल.
Oneplus Pad 2: वनप्लस लाँच करणार नवीन टॅब; 67W फास्ट चार्जिंगसह, मिळेल 12.1 इंच डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर, किंमत जाणून घ्या
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वनप्लस नॉर्ड 4 ची किंमत

कंपनीनं वनप्लस नॉर्ड 4 फोन 29,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 8GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. याचा एक 8GB RAM व 256GB स्टोरेज व्हेरिएंट देखील आला आहे जो 32,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर टॉप मॉडेल 12GB RAM व 256GB स्टोरेजसह 35,999 रुपयांना पडेल.

फोनच्या 20 जुलैपासून 30 जुलैपर्यंत प्री-ऑर्डर करता येईल. तर याची विक्री 2 ऑगस्टपासून सुरु होईल. लाँच ऑफर अंतर्ग, ICICI बँक कार्ड डिस्काउंटसह फोनचे सर्व व्हेरिएंट्स अनुक्रमे 27,999 रुपये, 29,999 आणि 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना 8GB RAM व 256GB स्टोरेज मॉडेल 32,999 रुपयांच्या ऐवजी 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 35,999 रुपयांच्या ऐवजी 31,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.