Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus Pad 2: OnePlusचा बहुप्रतिक्षित टॅब 9510mAh बॅटरीसह लॉन्च, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

11

OnePlus Pad 2: वनप्लसचा नवीन टॅबलेट बाजारात दाखल झाला आहे, या टॅबमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळत आहेत. कंपनीच्या या लेटेस्ट टॅबमध्ये तुम्हाला गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा उत्तम अनुभव मिळेल. या टॅबच्या किंमती आणि फिचर्सबद्दल संपूर्ण डिटेल्स येथे पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
OnePlus ने आपला OnePlus Pad 2 लॉन्च केला आहे. या टॅबची साईज लॅपटॉपपेक्षा कमी नाही, त्याच्या बॉक्समध्ये तुम्हाला टॅब ऑपरेट करण्यासाठी एक पेन्सिल आणि स्मार्ट कीबोर्ड देखील मिळतो. वनप्लसच्या या पॅडचा आकार मिनी लॅपटॉपसारखा आहे. याचा अर्थ पॅडच्या डिझाइन आणि किंमतीत तुम्हाला लॅपटॉपचा अनुभव मिळणार आहे. हा टॅब तुम्हाला गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा चांगला अनुभव मिळणार आहे.

OnePlus Pad 2 Android 14-आधारित OxygenOS 14 वर चालतं, आणि त्यात 12.1 इंचचा 3K (2,120×3,000 पिक्सेल) LCD डिस्प्ले आहे, ज्यात 144Hz रिफ्रेश रेट, 303ppi पिक्सेल डेन्सिटी, 88.40 पटक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 900 nits पीक ब्राइटनेस सपोर्टेड आहे. डिस्प्लेत Dolby Vision सपोर्ट आहे. ह्या टॅबलेटवर Snapdargon 8 Gen 3 चिपसेट वापरला गेला आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे.

OnePlus Pad 2चे आकर्षक फिचर्स

वनप्लसचा हा नवीन पॅड Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला 12.1 इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळत आहे जो 3K रिझोल्यूशनसह येतो. फोटो-व्हिडिओग्राफीसाठी, तुम्हाला या पॅडच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा सेटअप मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

OnePlus Pad 2मधील बॅटरी

यामध्ये तुम्हाला इतर कोणत्याही स्मार्टफोनपेक्षा जास्त बॅटरी मिळत आहे. एकंदरीत, तुम्हाला मिनी लॅपटॉपच्या आकारात पॅड मिळत आहे जो तुम्ही कुठेही सोबत नेऊ शकता.

किंमत आणि उपलब्धता

तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तो खरेदी करू शकाल. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, तुम्हाला ते 39,999 रुपयांना मिळेल, जर तुमच्याकडे ICICI बँक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. १ ऑगस्टपासून तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते खरेदी करू शकाल.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.