Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य,17 जुलै 2024 : मूलांक 1 बोलण्यावर ठेवा नियंत्रण ! मूलांक 8 व्यापारात करू नका गुंतवणूक, होईल घात ! तुमचा मूलांक काय सांगतो? जाणून घेऊया.
मूलांक 1 : बोलण्यावर नियंत्रण ठेवा
मूलांक 1 असलेल्यांना आज दिवस फार चांगला जाईल. व्यापारी वर्गासाठी आज दिवस फार चांगला आहे. तुम्हाला आज सरकारकडून एखादे मोठे काॅन्ट्रॅक्ट मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज पैशांचे आवक चांगली राहील. कौटुंबिक विषयात आज दिवस फार चांगला राहील. जोडीदारासोबत दिवस सुखद व्यतित कराल. तुम्हाला आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. एकूण विचार करता आजचा दिवस अनुकूल राहील.
मूलांक 2 : सोन्यात गुंतवणूक करावी
मूलांक 2 असलेल्यांना आज दिवस चांगला जाईल. पैशांचा विचार करता आजचा दिवस सामान्य दिवसापेक्षा फार चांगला जाईल. आज आकस्मिक धनलाभ होईल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यापाराच्या दृष्टिकोनातून आज दिवस फार चांगला राहील. आज तुम्हाला सल्ला राहील की सोन्यात पैशांची गुंतवणूक करावी, याचा जवळच्या भविष्यात तुम्हाला लाभ मिळेल. कौटुंबिक दृष्टिकोनातून आजचा दिवस फार चांगला जाईल. जोडीदाराला तुम्ही तुमच्या सुखदुखाच्या गोष्टी शेअर कराल.
मूलांक 3 : व्यापार विस्तारासाठी नवे मार्ग
मूलांक 3 असलेल्यांना आजचा दिवस अनुकूल राहील. व्यापारी वर्गाला आजचा दिवस चांगला जाईल. व्यापार विस्तारासाठी तुम्ही नवे मार्ग शोधाल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला नाव आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळेल. आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षकपणा राहील, त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमचे बोलणे ऐकतील आणि तुमच्याशी सहमत असतील. कौटुंबिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील, याकडे लक्ष द्या, लाभ होईल.
मूलांक 4 : त्रासदायक दिवस
मूलांक 4 असलेल्यांना आजचा दिवस फार त्रासदायक राहील. आज तुम्ही अनावश्यक धावपळीत गुंतून जाल. आज पैशांचा आभाव राहील, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. आज तुम्हाला एखादा आजार होईल, अशी शक्यता दिसत आहे. उपाय म्हणून आज शिवलिंगावर काळे तीळ घातलेले पाणी अपर्ण करावे, त्यामुळे समस्या कमी होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जोडीदारासाोबत आजचा दिवस चांगला व्यतित होईल.
मूलांक 5 : व्यापारात नव्या संधी मिळतील
मूलांक 5 असलेल्यांना आज दिवस अनुकूल आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. व्यापार वाढवण्यासाठी तुम्हाला नव्या संधी मिळतील. तुम्ही आज पैशांची गुंतवणूक कराल, त्यामुळे पैशाच्या बाबतीत तुम्हाला काही तुटवडा जाणवू शकतो. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. आज घरचे सदस्य तुमची प्रशंसा करतील. जोडीदारासोबत आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 6 : जोडीदाराचा सल्ला घ्या
मूलांक 6 असलेल्यांना आज दिवस अनुकूल राहील. व्यापारात तुमच्या योजनांची प्रगती होईल. तुमची सकारात्मक वर्तणूक तुम्हाला प्रत्येक वळणावर साथ देईल. आज व्यापार विस्ताराबद्दल सखोल विचार करू शकता. पण कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला आवश्य घ्या. कौटुंबिक बाबतीतही आजचा दिवस ठीक आहे. कुटुंबीय तुमच्या निर्णयात तुमच्यासोबत असतील.
मूलांक 7 – संयम ठेवा, सौम्य भाषेचा वापर करा
मूलांक 7 असलेल्यांना आज त्रासाचा सामना करावा लागेल. आज कोणत्याही सरकारी संस्थेतील कर्मचाऱ्याशी वाद ओढवून घेऊ नका, कारण अहंकारामुळे तुम्ही स्वतःचे काम स्वतः बिघडवून घ्याल असेल वाटत आहे. आज तुम्हाला सल्ला राहील की संयम ठेवा आणि सौम्य भाषेचा वापर करा. कौटुंबिक बाबतीत आज दिवस ठीक राहील. परंतु तुमच्या खराब वर्तणुकीमुळे कुटुंबातील सदस्य नाराज होतील. जोडीदारासोबतही सांभाळून बोला.
मूलांक 8 – नवीन गुंतवणूक नको
मूलांक 8 असलेल्यांना आज दिवस फारसा खास नाही. पैशांच्या बाबतीत कोणतीही नवी गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात आज सांभाळून राहा, आज कोणाशीही भांडणू ओढवून घेऊ नका आणि वादविवादात पडू नका. तुम्हाला सल्ला राहील की संयम ठेवा आणि सौम्य भाषेचा वापर करा. कौटुंबिक बाबतीत आज शांत राहा, आणि जोडीदारासोबत भांडण करू नका.
मूलांक 9 – थांबलेले पैसे हाती येतील
मूलांक 9 असलेल्यांना आज दिवस उत्तम राहील. पैशांच्या बाबतीत आज दिवस फार चांगला जाईल. आज थांबलेले पैसे हाती येतील. कौटुंबिक दृष्टिकोनातून आज दिवस फार चांगला राहील. आज कुटुंबीयांसोबत मिळून एखाध्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. कुटुंबात एखाद्या मंगलकार्याचा योग बनत असल्याचे दिसत आहे. जोडीदारासोबत आज दिवस चांगला जाईल. कुटुंबीयांसोबत आज जीवनाचा आनंद घ्याल.