Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
वाशिम रोडवरील ढाब्यावर अवैधरित्या पेट्रोल व डिझेलचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्यावर सहा.पोलिस अधिक्षक,बाळापुर यांचा छापा…
बाळापुर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १५/०७/२०२४ रोजी गोकुल राज जी, सहाय्यक पोलिस अधिक्षक,तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापुर अकोला यांना गुप्त बातमीदाराकडुन गोपनीय माहीती मिळाली की, पातुर ते वाशिम रोडवरील बोडखा परीसरातील असलेल्या नॅशनल ढाबा येथे काही लोक आपल्या अर्थिक फायदया करीता अवैधरित्या पेट्रोल व डिझेल चा साठा करून तो विक्री करतात
अशा माहीतीवरून सहा.पोलिस अधिक्षक गोकुल राज जी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांचे सोबत पथकासह सदर ठिकाणी जावुन छापा कार्यवाही केली असता. १) एक महिंद्रा बोलेरो पिकअप क्रंमाक MH29 AT0048 किंमत अंदाजे ३००००० / रू.,२)सहा प्लॅस्टीकचे बॅरल २५० लीटर क्षमतेचे ज्यामध्ये डिझेल पुर्ण भरलेले असे एकुण १५०० लीटर व एक प्लॅस्टीक बॅरेल ज्यामध्ये अंदाजे २० लीटर डिझेल असे एकुण १५२० लीटर किंमत १५२०००-/रू. चे डिझेल, ३)तीन प्लॅस्टीकचे बॅरल २५० लीटर क्षमतेची ज्यामध्ये पेट्रोल पुर्ण भरलेले असे एकुण ७५० लीटर किंमत ७८७५०-/ रू. चे ४)पेट्रोल, द्राव्यरूपी ज्वलनशील इंधन मोजण्यासाठी एक दहा लिटरचे माप किंमत अंदाजे २०० / रू., एक विस लिटरचे माप किंमत अंदाजे ३०० / रू.,५) एक प्लॅस्टीकची चाडी व जुन्या वापरत्या प्लॅस्टीकचे कॅन ६)एक प्लास्टीक पाईक किंमत अंदाजे २०० / रू. असा एकुण ५३१४५०-/ रू. चा मुद्देमाल अवैधरित्या साठवणुक व विक्री करण्याचे उददेशाने मिळुन आला
यावरुन आरोपी १) नवाज खान परवेज खान वय २३ वर्षे, रा. चांद खॉ प्लॉट वाशिम बायपास अकोला, २) मोहम्मद फरहान मोहम्मद रज्जाक वय ३६ वर्षे, रा. रियाज कॉलनी वाशिम बायपास अकोला. यांचे विरूध्द पो.स्टे. पातुर येथे अप.नं. ३९५ / २०२४ कलम २८७, ३ ( ५ ) भा. न्या. सं. सहकलम ३, ७ई सी अॅक्ट. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक बच्चन सिंग,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,बाळापुर गोकुलराज यांचे सह त्यांचे पथकाने केली