Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus Nord Buds 3 Pro: एक-दोन नव्हे सहा माईक्ससह आले वनप्लसचे इअरबड्स; 44 तास ऐकता येईल म्युजिक, इतकी आहे किंमत

10

OnePlus Nord Buds 3 Pro भारतीय बाजरात लाँच झाले आहेत. यात 12.4 mm डायनॅमिक ड्रायव्हर्स, प्रत्येक इअरबड मध्ये थ्री-माइक सिस्टम आणि IP55 रेटिंग आहे. हे बड्स सॉफ्ट झेड आणि स्टारी ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
वनप्लस नॉर्ड बड्स ३ प्रो
OnePlus Nord Buds 3 Pro TWS इअरबड्स 16 जुलैला भारतात लाँच करण्यात आले. यात 49dB पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC), ड्युअल-डिवाइस कनेक्टिव्हिटी आणि कस्टमाइजेबल इक्वलाइजर सेटिंग्स असेल पर्याय मिळतात. हे ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इअरबड्स Hey Melogy अ‍ॅपसह कम्पॅटिबल आहेत आणि एकूण 44 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देतात. इअरबड्स धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी IP55 रेटेड आहेत आणि असं सांगण्यात आलं आहे की यातील थ्री-माइक सिस्टम क्लीयर कॉल एक्सपीरिएंस देते.

वनप्लस नॉर्ड बड्स 3 प्रो ची किंमत

OnePlus Nord Buds 3 Pro ची भारतातील किंमत 3,299 रुपये आहे आणि हे अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून 20 जुलैपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील. हे बड्स दोन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहेत, ज्यात सॉफ्ट झेड आणि स्टारी ब्लॅकचा समावेश आहे.
Oneplus Pad 2: वनप्लस लाँच करणार नवीन टॅब; 67W फास्ट चार्जिंगसह, मिळेल 12.1 इंच डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर, किंमत जाणून घ्या

वनप्लस नॉर्ड बड्स 3 प्रो स्पेसिफिकेशन

या बड्समध्ये 12.4 mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत आणि प्रत्येक इअरबड मध्ये थ्री-माइक सिस्टम आहे. त्यामुळे फोन कॉल दरम्यान गोंधळ कमी करण्यासाठी चांगला ANC सपोर्ट देतात. इअरबड्स ट्रान्स्परन्सी मोडसह 49dB पर्यंत ANC ला सपोर्ट करतात.

नवीन वनप्लस नॉर्ड बड्स 3 प्रो Hey Melody अ‍ॅप्लिकेशनसह कंपेटिबल आहेत. युजर्स या अ‍ॅपचा वापर करून नॉइज कॅन्सलेशन लेव्हल्स मॅनेज करू शकतात आणि इक्विलायजेशन सेटिंग्स अ‍ॅडजस्ट करू शकतात. ANC लेव्हल्स तीन प्रीसेटमध्ये अ‍ॅक्सेस करता येईल. ज्यात माइल्ड, मॉडरेट आणि मॅक्सिममचा समावेश आहे. हे Google फास्ट पेयर आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटीसह SBC आणि AAC ऑडियो कोडॅक्सला देखील सपोर्ट करतात.

वनप्लसनं नॉर्ड बड्स 3 प्रो चार्जिंग केसमध्ये 440mAh ची बॅटरी पॅक करण्यात आली आहे, तर प्रत्येक इअरबडमध्ये 58mAh ची बॅटरी आहे. ANC विना, TWS इअरबड्स एकदा चार्ज केल्यावर केससह एकूण 44 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देऊ शकतात. केस यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते आणि 10 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगने 11 तास पर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळतो. इअरबड धूळ आणि शिंतोडण्यापासून वाचण्यासाठी IP55 रेटेड आहेत. प्रत्येक इअरबडचं वजन 4.4 ग्राम आणि केसचं वजन 38.2 ग्राम आहे.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.