Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fix laptop microphone issues: लॅपटॉपच्या मायक्रोफोन विषयीच्या समस्येला कंटाळलात? या ट्रिक्सच्या मदतीने घरच्या घरी करा फिक्स!

9

Fix laptop microphone issues: तुम्ही लॅपटॉप वापरत असाल आणि तुमच्या मायक्रोफोनच्या समस्यांमुळे त्रस्त असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला मायक्रोफोन विषयीच्या समस्या कशा सोडवायच्या याबद्दल माहिती मिळेल. तर पाहूया..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नोकरदार असो वा विद्यार्थी, आजच्या काळात लॅपटॉप हे प्रत्येकाची गरज बनले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या लॅपटॉपचा मायक्रोफोन नीट काम करत नसेल, ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे लोकांना त्रास होतो. अनेकदा सायलेंट माइक तुमच्या व्हिडिओ कॉल आणि रेकॉर्डिंगमध्ये अडथळा आणतो. अशा परिस्थितीत काळजी करू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या मदतीने Windows लॅपटॉपवरील सामान्य मायक्रोफोन समस्या फिक्स करून त्याला वर्किंग कंडिशनमध्ये आणू शकता.

मायक्रोफोनच्या सेटिंग्स चेक करा

  • काहीवेळा ही समस्या खूप सामान्य असते आणि तुम्ही सेटिंग्समध्ये थोडासा बदल करून ती सहज सोडवू शकता.
  • यासाठी तुमच्या टास्कबारमधील स्पीकर आयकॉनवर राईट क्लिक करा आणि ‘साउंड सेटिंग्स’ वर जा.
  • आता ‘इनपुट’ ऑप्शनमध्ये तुमच्या लॅपटॉपचा मायक्रोफोन डीफॉल्ट रेकॉर्डिंग डिव्हाइस म्हणून सेट करा.
  • याशिवाय, परफॉर्मन्स सुधारण्यासाठी तुम्ही येथे मायक्रोफोनचा आवाज ऍडजस्ट करू शकता.

मायक्रोफोन अनम्यूट करा

कधी कधी नकळत आपण आपल्या उपकरणाचा मायक्रोफोन म्यूट करतो. हे सोपे वाटू शकते, परंतु मायक्रोफोन अनम्यूट करणे ही एक सामान्य समस्या आहे.

  • तुम्ही सेटिंग्ज ऑप्शन्सच्या टास्कबारमधील स्पीकर आयकॉनवर राईट क्लिक करून ‘ऑडिओ सेटिंग्ज’च्या ‘इनपुट’ सेक्शनमध्ये जाऊ शकता.
  • येथे चेक करा की तुमचा मायक्रोफोन म्यूट केलेला नाही. तसे असल्यास, एक क्लिक करून तो अनम्यूट करा.

ऑडिओ ड्रायव्हर अपडेट करा

बर्‍याचदा आऊटडेटेड किंवा बिघाड झालेले ऑडिओ ड्रायव्हर्समुळे तुमचा मायक्रोफोन काम करणे थांबवतो. यावेळी लॅपटॉप कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या आणि लेटेस्ट ऑडिओ ड्रायव्हर अपडेट डाउनलोड करा. ते काम करत नसल्यास, काही ड्रायव्हर अपडेट युटिलिटी तुमची मदत करू शकते.

ट्रबलशूटिंग टूल वापरा

विंडोजमध्ये बिल्ट-इन ट्रबलशूटिंग टूल आहे, जे अशा परिस्थितीत तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.यासाठी स्टार्ट मेनूमध्ये ‘ट्रबलशूटर’ शोधा आणि ट्रबलशूटर सेटिंग्जवर जा.

  • आता ‘रेकॉर्डिंग ऑडिओ ट्रबलशूटर’ ऑन करा.
  • यामुळे तुमच्या मायक्रोफोनच्या समस्या दूर होऊ शकतात.

मालवेअरमुळे समस्या

  • मालवेअर आणि सॉफ्टवेअर तुमच्या मायक्रोफोनच्या फंक्शनमध्ये समस्या आणू शकतात.
  • कोणतेही धोके दूर करण्यासाठी अँटीव्हायरस स्कॅन नक्की करून घ्या.
  • अलीकडील सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन्स किंवा अपडेट्सकडे लक्ष द्या ज्यामुळे हे धोके निर्माण होऊ शकतात.

या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या लॅपटॉपच्या मायक्रोफोनच्या समस्यांवर मात करू शकता आणि त्याला वर्किंग कंडिशनमध्ये आणू शकता.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.