Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Hisense Smart TV: 100 इंचाचा क्यूएलईडी टीव्ही आला भारतात, इतकी आहे किंमत

9

Hisense QLED Miniled Smart TV भारतात विविध आकारात लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्ट टीव्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विकले जातील.यांची किंमत 31,999 रुपयांपासून सुरु होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Hisense नं नवीन QLED आणि MiniLED TVs भारतीय बाजारात लाँच केले आहेत. हे टीव्ही अनेक स्क्रीन साइज मध्ये आले आहेत. कंपनीनं चार नवीन मॉडेल Q7N, U7N, U6N Pro आणि E68N सादर केले आहेत. हे सर्व स्मार्ट टीव्ही दमदार फीचर्ससह आले आहेत. सध्या या स्मार्ट टीव्हीवर अनेक ऑफर्स मिळत आहेत. स्मार्ट टीव्हीची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन पुढे देण्यात आले आहेत.

हायसेन्स 2024 टीव्ही मॉडेल्सची किंमत

नवीन Hisense टीव्हीची प्रारंभिक किंमत 31,999 रुपये आहे. हे लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि Amazon वरून विकत घेता येतील. यांची विक्री 19 जुलैपासून सुरु होईल. सेलमध्ये टीव्हीवर 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. हा डिस्काउंट HDFC, ICICI, IDFC आणि SBI बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यावर मिळेल. Hisense U7N ची किंमत 79,999 रुपये, Hisense Q7N ची किंमत 53,999 रुपये आणि Hisense U6N Pro ची किंमत 59,999 रुपये आहे.

Hisense Q7N and U7N TV

हे स्मार्ट टीव्ही QLED पॅनलसह आले आहेत. यांच्या चार स्क्रीन साइज 55 इंच, 65 इंच, 85 इंच आणि 100 इंच आहे. Hisense U7N मध्ये MiniLED पॅनल मिळत आहेत. हे बेजल लेस डिजाइनसह आले आहेत. याची पीक ब्राइटनेस 1200 nits पर्यंत आहे. हे दोन स्क्रीन साइज 55 इंच आणि 65 इंच मध्ये आले आहेत. हे टीव्ही VIDAA ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. हे YouTube, Netflix, Amazon Prime Video, Disney+Hotstar सारख्या अ‍ॅप्सना सपोर्ट करतात, या सर्व टीव्ही मध्ये AI फीचर्स देण्यात आले आहेत.

Hisense U6N Pro and E68N TV

हे टीव्ही Dolby Vision आणि Dolby Atmos सपोर्टसह आले आहेत. यात गेम मोड प्लस आणि AI सपोर्ट्स मोड मिळतो. हे दोन स्क्रीन साइज 55 इंच आणि 65 इंच मध्ये आले आहेत. या Google TVचा सपोर्ट देण्यात आला आहे. Hisense E68N दोन स्क्रीन साइज 43 इंच आणि 55 इंचमध्ये आले आहेत. हे सर्व टीव्ही अनेक दमदार फीचर्ससह येतात.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.