Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Unihertz Jelly Max: जगातील सर्वात छोटा 5G फोन लाँच! 12GB रॅमसह यात आहे 100MP चा कॅमेरा

14

Smallest 5G Phone Unihertz Jelly Max: हा मोबाइल फोन मीडियाटेकच्या Dimensity 7300 चिपसेटसह बाजारात आला आहे. याच्या डिस्प्लेचा आकार 5.05 इंच आहे. इतका छोटा असून देखील यात 100MP चा मेन कॅमेरा आणि 12GB रॅम देण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Unihertz नं जागतिक सर्वात छोटा 5G फोन Jelly Max लाँच केला आहे. युजर्स या फोनची वाट अनेक दिवस पाहत होते. कारण स्मार्टफोन मार्केटमध्ये काही युजर्स असे देखील आशेत ज्यांना मोठ्या आकाराच्या स्मार्टफोन ऐवजी कॉम्पेक्ट साइजचे स्मार्टफोन वापरायला आवडतात. Unihertz Jelly Max मध्ये 5.05 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने हा जगातील सर्वात छोटा 5जी फोन असल्याचा दावा केला आहे. फोनमध्ये 100MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाइल मीडियाटेकच्या Dimensity 7300 चिपसेटसह आला आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या इतर खास फीचर्स बाबत.

युनिहर्ट्झ जेली मॅक्सचे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 5.05 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात 720 x 1520 पिक्सलचा रिजॉल्यूशन देण्यात आलं आहे. हा एक LCD पॅनल आहे ज्यात पंच होल कटआउट डिजाइन देण्यात आली आहे. डिवाइस MediaTek Dimensity 7300 चिपसेटसह आला आहे. त्याचबरोबर 12 जीबी LPDDR5 रॅम आहे आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.OnePlus Nord 4: काही मिनिटांत फुल चार्ज होईल हा वनप्लसचा फोन; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 100W फास्ट चार्जिंग

युनिहर्ट्झ जेली मॅक्स मधील सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील 100 मेगापिक्सलचा कॅमेरा. हा फोनचा प्रायमरी सेन्सर आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा पंचहोल कटआउटमध्ये फिट करण्यात आला आहे.

बॅटरी कपॅसिटी पाहता, या डिव्हाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. एक छोट्या स्मार्टफोनसाठी ही मोठी बॅटरी म्हणता येईल. त्याचबरोबर 66W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे हा फोन 90 टक्क्यांपर्यंत फक्त 20 मिनिटांत चार्ज होतो.

फोन Android 14 वर चालतो. कनेक्टिविटीसाठी यात 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC आणि इंफ्रारेड पोर्टचा सपोर्ट मिळतो. ज्यामुळे काही होम अप्लायन्सेज कंट्रोल करता येतात. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनचे डायमेन्शन 128.7 x 62.7 x 16.3mm आहेत आणि वजन 180 ग्राम आहे.

सिद्धेश जाधव

लेखकाबद्दलसिद्धेश जाधवसिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.