Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Honor 200 5G Series: सेल्फी येईल टकटक! 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह दोन फोन आले भारतात; चांगल्या नेटवर्कसाठी कंपनीनं दिली खास चिप
Honor 200 5G Series चे दोन स्मार्टफोन भारतात आले आहेत. लाँच करण्यात आला आहे. या दोन्ही फोन्समध्ये 50MP सेल्फी आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन्समध्ये चांगल्या नेटवर्कसाठी स्पेशल चिप देण्यात आली आहे.
ऑनर 200 5जी चे स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED Quad Curved डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, पिक्सल रिजोल्यूशन 2664 X 1200 आणि पीक ब्राइटनेस 4000 nits आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेट Android 14 वर आधारित AI-powered MagicOS 8.0 वर चालतो. फोनमध्ये 12GB पर्यंत RAM सह 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
Moto G85 5G: पहिल्याच सेलमध्ये मिळतेय दणकट सूट; अशी आहे मोटोच्या नव्याकोऱ्या 5G फोनवरील ऑफर
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे OIS सपोर्टसह 50MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 50MP ची टेलीफोटो लेन्स मिळते. त्याचबरोबर 12MP चा अल्ट्रा वाइड आणि मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 50MP चा पोट्रेट सेल्फी कॅमेरा मिळतो.
Honor च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 5200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा 100W वायर्ड ऑनर सुपर चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात WIFI 2.4G/5GHz, Bluetooth 5.3, USB Type-C आणि ड्युअल सिम स्लॉट देण्यात आले आहेत.
ऑनर 200 प्रो 5जीचे स्पेसिफिकेशन्स
प्रो व्हेरिएंटमध्ये 6.8 इंचाचा Full HD+ Curved OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 4000nits आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. स्मार्टफोन 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह आला आहे. या फोनमध्ये 5200mAh ची बॅटरी मिळते. हा 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात 50MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनच्या मागे 50MP मेन, 12MP चा अल्ट्रा वाइड आणि 50MP चा टेलीफोटो कॅमेरा मिळतो. हा देखील MagicOS वर चालतो.
किंमत आणि उपलब्धता
Honor 200 5G स्मार्टफोन Moonlight White आणि Black या दोन कलर ऑप्शनमध्ये आला आहे. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM सह 256GB इंटरनल स्टोरेज मिळते, जो 34,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB RAM आणि 512GB स्टोरेजसह येतो. याची किंमत 39,999 रुपये आहे. यावर 1000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट आणि 2000 रुपयांचा बँक डिस्काउंट मिळेल. तसेच, फोनवर 2000 रुपयांपर्यंतचा कुपन डिस्काउंट देखील असेल.
प्रो व्हेरिएंट 57,999 रुपयांमध्ये आला आहे. यात 12GB RAM सह 512GB स्टोरेज मिळते. फोन Black आणि Ocean Cyan मध्ये आला आहे. लाँच ऑफर अंतगर्त ICICI बँकेच्या ग्राहक 8000 रुपयांच्या डिस्काउंटसह 2000 रुपयांचा कुपन डिस्काउंट मिळेल. हे दोन्ही फोन्स अॅमेझॉन प्राइम डे सेल मध्ये 20 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. दोन्ही फोन्सवरील ऑफर फक्त 20-21 जुलै पर्यंतसाठी वैध असतील.