Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
How To Search BSNL Network Coverage: जर तुम्ही BSNL नेटवर्कव्हर मोबाइल नंबर पोर्ट करण्याचा विचार करत असाल तर, त्याआधी तुमच्या परिसरात कंपनीचं मोबाइल नेटवर्क आहे का ते चेक करा. यासाठी तुमची NPERF च्या वेबसाइटचा वापर करू शकता.
टेलिकॉम नियमांनुसार, एकदा जियो, एअरटेल किंवा वोडाफोन-आयडिया मधून BSNL मोबाइल नेटवर्कवर स्विच केल्यास तुम्ही 90 दिवस म्हणजे 3 महिन्यापर्यंत दुसऱ्या नेटवर्कवर स्विच करू शकत नाही. त्यामुळे तुमचं साध्याच नेटवर्क सोडण्यापूर्वी थोडा विचार करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन समजेल BSNL नेटवर्कची कव्हरेज
BSNL नेटवर्क कव्हरेज ऑनलाइन NPERF वेबसाइटवरून समजू शकते. ही एक ग्लोबल वेबसाइट आहे जिथे सर्व देशांमधील मोबाइल नटेवर्क कव्हरेज पाहता येते. म्हणजे फक्त BSNL नव्हे तर कोणत्याही मोबाइल नेटवर्कवर स्विच करण्यापूर्वी तुम्ही NPERF वेबसाइटवर जाऊन माहिती घेऊ शकता.
अशी आहे प्रॉसेस
- सर्वप्रथम nperf वेबसाइटवर जा.
- त्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल, ज्यातून Map ऑप्शनवर जा.
- त्यानंतर Country आणि मोबाइल नेटवर्क ऑप्शन सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुमचं लोकेशन किंवा शहर सर्च करा.
- अशाप्रकारे तुम्ही तुमच्या क्षेत्रातील BSNL सह इतर कोणतंही नेटवर्क सर्च करू शकता.
नोट: काही ब्राउजर्सवर या वेबसाइटवरील नेटवर्क मॅप अर्धवट दाखवला जाऊ शकतो त्यामुळे एकदा दुसऱ्या ब्राऊजरवरून माहिती कन्फर्म करून घ्या.
BSNL मध्ये मोबाइल नंबर पोर्ट कसा करायचा
- सर्वप्रथम 1900 वर पोर्ट रिक्वेस्ट पाठवा.
- यासाठी मेसेज बॉक्समध्ये ‘PORT स्पेस आणि 10 डिजिट मोबाइल लिहून पाठवा.
- त्यानंतर BSNL सेंटरवर जाऊन आधारसह इतर माहिती द्या.
- अशाप्रकारे तुमची पोर्ट रिक्वेस्ट पूर्ण होईल.
नंबर पोर्ट करताना
टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI नं मोबाइल नंबर पोर्ट करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे नवीन टेलिकॉम ऑपरेटरवर शिफ्ट होण्यासाठी 7 दिवस वाट पाहावी लागेल. याचा विचार देखील पोर्ट करण्यापूर्वी करा.