Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Amazon Prime Day Sale: फक्त डिस्काउंट नव्हे तर इअरबड्स देखील फ्री; वनप्लसच्या फोन्सवर मिळणार जबरदस्त ऑफर
Amazon Prime Day Sale: OnePlus 12, OnePlus 12R वर अॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान डिस्काउंट मिळेल. यातील आर लाइनअप मॉडेल सोबत OnePlus Buds 3 इअरबड्स फ्री मिळत आहेत. ही कंपनीची फ्लॅगशिप सीरिज आहे.
वनप्लस स्मार्टफोनवरील डिस्काउंट
वनप्लस 12 वरील ऑफर्स
OnePlus 12 आणि OnePlus 12R वर अॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान डिस्काउंट मिळेल. वनप्लस 12 वर थेट 5,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे, ज्यामुळे 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत कमी होऊन 53,000 रुपये आणि 16GB/512GB व्हेरिएंटची किंमत 65,000 रुपये झाली आहे. तसेच ICICI आणि वनकार्ड युजर्ससाठी 7,000 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. विशेष म्हणजे लाँचच्या वेळी दोन्ही व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आणि 69,999 रुपये होती. वनप्लस 12 स्काय ब्लॅक, ग्लेशियल व्हाईट आणि फ्लोई एमराल्ड अश्या शेड्स मध्ये उपलब्ध आहे.Flipkart GOAT Sale Date 2024: महागडे फोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या फ्लिपकार्टचा हा आकर्षक सेल कधी सुरू होईल
वनप्लस 12आर वरील ऑफर्स
वनप्लस 12आर च्या 8GBरॅम व 256GB व्हेरिएंट सोबत OnePlus Buds 3 इअरबड्स फ्री मिळत आहेत आणि आयसीआयसीआय आणि वनकार्ड युजर्ससाठी 3,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटसह आणि 16GB रॅम व 256GB व्हेरिएंट 42,999 रुपये आणि 8GB रॅम व 256GB व्हेरिएंट 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच, 2 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह येणाऱ्या 8GB रॅम व 128GB व्हेरिएंट 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लाँचच्या वेळी वनप्लस 12आरच्या 8GB रॅम व 128GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये, 8GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आणि 16GB+256GB व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये होती. हा स्मार्टफोन आयरन ग्रे, कूल ब्लू आणि सनसेट ड्यून कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
अॅमेझॉन सेल दरम्यान ग्राहक 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय आणि JioPlus पोस्टपेड प्लॅनवर 2250 रुपयांच्या फायदे, 6 महिन्यापर्यत 100GB Google One क्लाउड स्टोरेज आणि 3 महिन्यापर्यंत YouTube प्रीमियमचा लाभ घेता येईल.