Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Solar Panels: पावसाळ्याच्या दिवसात सूर्य खूप कमी वेळा ढगांमधून बाहेर येतो अशावेळी सोलर पॅनल काम करतात की नाही ते सूर्यप्रकाशाशिवाय वीज निर्माण करू शकतात का? असा प्रश्न उपस्थित होतो. याबद्दलच्या संपूर्ण डिटेल्स आपल्याला इथं वाचायला मिळणार आहे. जाणून घ्या तुम्ही देखील मोठा खर्च करुन सोलर बसवण्याचा विचार करत असाल तर पावसाळ्यात ते काम करेल की नाही.
सोलर पॅनेल पावसात काम करतात की नाही हा पहिला प्रश्न अनेकांना पडतो, त्याचे उत्तर हो असे आहे. हे पॅनल्स पावसाळ्यात देखील काम करतात मात्र यावेळी त्यांची वर्किंग कॅपॅसिटी कमी होते.
पावसाचा सोलर पॅनेलवर असा परिणाम होतो
पावसादरम्यान, सूर्यप्रकाश कमी होतो, ज्यामुळे सोलर पॅनेल कमी इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात. परंतु जेव्हा पावसाचे पाणी सोलर पॅनेलच्या सरफेसवर साचते तेव्हा सूर्यप्रकाश पॅनेलपर्यंत पोहोचणे कठीण होते. पावसामुळे टेंप्रेचरमध्ये घट होऊ शकते, ज्यामुळे सोलर पॅनेलची कॅपॅसिटी देखील कमी होते. मात्र एवढे असूनही सोलर पॅनल पावसात देखील वीजेचा पुरवठा करतात.
सूर्यप्रकाशाशिवाय सोलर पॅनेल वीज कशी पुरवतात?
सोलर पॅनेल दिवसा वीज निर्माण करतात आणि बॅटरीमध्ये साठवतात. पावसाळ्यात, जेव्हा कमी सूर्यप्रकाश असतो, तेव्हा बॅटरीमध्ये साठवलेली वीज घरे आणि इतर डिव्हाइसेसला वीज पुरवण्यासाठी वापरण्यात येते. सोलर पॅनेलमधून निर्माण होणारी वीज डायरेक्ट करंट (DC) मध्ये असते. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिवाईसेसचे अल्टरनेटिंग करंट (AC) वीज लागते. इन्व्हर्टर डीसी विजेचे एसी विजेमध्ये प्रोसेस करतो.
दोन प्रकारचे सोलर पॅनल्स
बाजारात दोन प्रकारचे सोलर पॅनल उपलब्ध आहेत, एक ज्याला बॅटरीची गरज नाही. हे सोलर पॅनल्स थोडे स्वस्त आहेत, सरकार तुम्हाला त्यावर सबसिडी देखील देते. ज्या दिवशी जास्त वीज निर्माण होते, ती तुम्ही सरकारलाही देऊ शकता. अशा परिस्थितीत सरकार रात्री किंवा गरजेच्या वेळी वीज परत करते. इतर सोलर पॅनेल बॅटरीसह येतात ज्या सूर्यप्रकाशात वीज साठवतात. यामध्ये सूर्यप्रकाश सल्याच्या किंवा नसल्याचा काही फरक पडत नाही.