Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

111858053

18

Vyas Purnima Katha In Marathi :
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेची तिथी साजरी केली जाते. याला व्यासपौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असे म्हटले जाते. यंदा गुरुपौर्णिमा ही २१ जुलैला साजरी केली जाणार आहे.

आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेची कथा

गुरुपौर्णिमा कथा

महर्षी वेद व्यास यांचा जन्म सुमारे ३००० वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमासारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरु झाल्याचे मानले जाते.

गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन. महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आई-वडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. पण त्यांच्या आई-वडिलांनी ही इच्छा नाकारली.

महर्षि वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरुन त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वनात ते गेले. त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्राविण्य प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला. त्यांनी महाभारत, अठरा महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले, त्यांना असे वरदान मिळाले होते. त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून पूजले जाते. आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा कशी करावी?

<strong>गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा कशी करावी?</strong>
  1. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची नाही तर कुटुंबातील मोठ्या लोकांची तसेच आई-वडिलांना गुरु समान मानले पाहिजे.
  2. गुरुंच्या कृपेने विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होते.
  3. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास मुनींचा फोटो ठेवून दिवा आणि उदबत्ती लावा. तसेच फुले, फळे, मिठाई आणि इतर शुभ वस्तू अर्पण करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.