Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pixel 9 Pro Fold: अॅप्पल नव्हे सॅमसंगला मागे टाकण्यासाठी गुगल सज्ज; नवीन फोल्ड फोन येतोय या तारखेला
Google Pixel 9 Pro Fold: लवकरच गुगलचा नवीन फोल्ड फोन सादर केला जाईल. यावेळी या हँडसेटचा समावेश Pixel 9 सीरिजमध्ये केला जाईल. पुढील महिन्यात होणाऱ्या एका इव्हेंटच्या माध्यमातून Pixel 9 Pro सोबत Pixel 9 Pro Fold देखील लाँच होईल.
गुगल पिक्सल 9 प्रो फोल्डची डिजाइन
गुगल पिक्सल 9 प्रो ची माहिती दिल्यानंतर लगेचच Google नं डिजाइन आणि नावाचा खुलासा करत एका टीजर व्हिडीओ मध्ये Pixel 9 Pro Fold दाखवला. हा स्मार्टफोन “फोल्डेबल फोन बिल्ट फॉर द जेमिनी एरा” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये एक एआय चॅटबॉट दिसत आहे. या फोल्डेबलमध्ये एक आयताकृती प्रायमरी कॅमेरा बंप आहे आणि लेन्स ड्यूल लेव्हल डिजाइनमध्ये वर्टिकली सेट करण्यात आल्या आहेत.
OnePlus Nord Buds 3 Pro: एक-दोन नव्हे सहा माईक्ससह आले वनप्लसचे इअरबड्स; 44 तास ऐकता येईल म्युजिक, इतकी आहे किंमत
टीजर व्हिडीओमध्ये Pixel 9 Pro Fold च्या एक्सटरनल डिस्प्ले आणि हिंज मॅकॅनिज्मची माहिती मिळाली आहे. कव्हर डिस्प्लेमध्ये होल पंच कटआउट आहे. हा फोन ऑफ-व्हाइट फिनिशसह येईल जी Google च्या सिग्नेचर पोर्सिलेन शेड सारखी दिसते. लाँच नंतर अचूक माहिती मिळेल.
गुगल पिक्सल 9 प्रो फोल्ड भारतीय लाँच
Google नं स्पष्ट केलं आहे की कंपनी Pixel 9 Pro Fold भारतात सादर करेल. गेल्यावर्षी आलेला Google Pixel Fold देशात लाँच झाला नव्हता. ग्लोबल लाँच इव्हेंट नंतर एक दिवसांनी 14 ऑगस्टला देशात Pixel 9 Pro सह बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन सादर केला जाईल.
X वरील पोस्टमध्ये Google India नं लिहलं आहे की “आउट विद द ओल्ड, इन विद द फोल्ड,” Google Pixel 9 Pro Fold भारतात पहिल्यांदा येत आहे. पोस्टमध्ये स्मार्टफोनचा एक ब्लॅक कलर ऑप्शन दाखवण्यात आला आहे. गुगलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Pixel Fold अद्याप भारतात आलेला नाही. Pixel 9 Pro Fold भारतात आल्यास Galaxy Z Fold 6, OnePlus Open आणि Tecno Phantom V Fold ला देऊ शकतो.