Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Courier Scam Alert : ऑनलाइन शॉपिंगकडे वळल्या स्कॅमर्सच्या नजरा, कुरिअर बॉय बनून अशा पद्धतीने केला जातोय स्कॅम

10

Courier Scam Alert: आजकाल सायबर क्राइमच्या घटनांबद्दल आपण वारंवार ऐकत असतो. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवनवीन ट्रिक्सचा वापर करीत असतात. सध्या, हे लोक कुरिअर आणि खोट्या पार्सलच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करत आहेत. अनेकदा ते लोकांना त्यांच्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून डिजिटल अरेस्टसारख्या गोष्टींचा वापर करतात. आपण या स्कॅमपासून कसे सुरक्षित राहू शकता, ते जाणून घ्या..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजच्या आधुनिक जगात चोर देखील अपडेट झाले आहेत. विविध मार्गाने लोकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं रोज घडत असतात. ऑनलाइन खरेदीचे वाढते प्रमाण बघून स्कॅमर्सने ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्याच्या अनेक युक्त्या शोधून काढल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन सायबर ठग कुरिअर आणि डिलीव्हरी बॉय बनून लोकांना फसवत आहेत.

कुरिअर बॉय बनून फसवणूक

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट राजकुमार सांगतात की आपण डिजिटल दुनियेत तर जगतो आहोत, पण येथे येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपण तयार नाहीत. याचाच फायदा हे सायबर स्कॅमर्स घेतात. हे दररोज हजारो लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी फसवतात. त्यांना माहिती असते की आजकाल प्रत्येक घरात सामान ऑर्डर केले जाते आणि दररोज लोकांच्या घरी सामानाची डिलिव्हरी होत असते. अशा स्थितीत त्यांना डिलिव्हरीच्या नावाखाली फसवणे खूप सोपे असते. म्हणूनच आजकाल हे लोक कुरिअर कंपनीचा एजंट असल्याचे भासवून फसवतात.

कुरिअरद्वारे कशा प्रकारे करण्यात येते फसवणूक

फोन करून फसवणूक: हे फोन करून सांगतात की तुमचे काही पार्सल आले आहे पण आमचा कुरिअर बॉय तुमचे घर शोधू शकत नाही, कृपया तुम्ही या नंबरवर कॉल करून त्याला घराचा पत्ता सांगा. तुम्ही त्या नंबरवर कॉल करता, तो फोन एक रिंग झाल्यावर कट होतो. या नंबरमध्ये असे डिजिट वापरलेले असतात की तुमचा फोन हॅक होतो आणि हे तुमच्या फोनचा ऍक्सेस घेतात. यानंतर हे तुमच्या फोनद्वारे तुमचे अकाऊंट रिकामे करतात.

कुरिअर बॉय बनून फसवणूक: दुसरे हॅक म्हणजे कुरिअर बॉय बनून एक पार्सल घेऊन तुमच्या घरी येतात. तुम्ही सांगता की हे पार्सल किंवा ऑर्डर तुमचे नाही. ते तुम्हाला एका लिंकवर क्लिक करून ते कॅन्सल करण्यास सांगतात. त्या लिंकवर क्लिक केल्याने तुमचा फोन हॅक होतो.

बनावट वेबसाइटचा वापर: तिसरे हॅक म्हणजे हे वेबसाइटचा वापर करतात. हे फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर वेबसाइट तयार करतात आणि एसईओद्वारे त्यांची रँकिंग वाढवून त्या वेबसाइटला सर्च इंजिनवर टॉपवर ठेवतात. तुम्ही ट्रॅकिंगसाठी त्यांच्या दिलेल्या कस्टमर केअर नंबरवर बोलता, ते तुमची सर्व माहिती घेतात आणि काही चूक सांगून तुम्हाला 25 रुपये पेमेंट करण्यास सांगतात. पेमेंटसाठी फ्रॉड लिंकचा वापर करून फोन हॅक करतात.

नार्कोटिक्स किंवा कस्टम अधिकारी बनून फसवणूक: चौथे हॅक म्हणजे नार्कोटिक्स किंवा कस्टम अधिकारी असल्याचे सांगून फसवणे. हे डेटाबेसमधून विदेशात पार्सल आणि सामान पाठवणाऱ्या लोकांना फोन करतात आणि पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून घाबरवतात. यानंतर मोठी रक्कम घेतल्याशिवाय सोडत नाहीत.

सायबर क्राइममधून स्वतःचा बचाव कसा करावा?

एसीपी, सायबर क्राइम, नोएडा, विवेक रंजन राय सांगतात की असे कॉल आल्यास घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तात्काळ त्या नंबरला ब्लॉक करून 1930 वर किंवा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करू शकता. कोणत्याही अधिकाऱ्याला पैसे ट्रान्सफर करू नका. आपल्या छोट्या चुकीमुळे आपल्याला फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सावधानता आणि सतर्कता महत्त्वाची आहे. कुरिअर कंपन्यांनाही त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलावी लागतील.

सिटिक्स लॉजिस्टिक्सचे वाइस प्रेसीडेंट अनुपम राय सांगतात की प्रत्येक कुरिअर कंपनीचे बेसिक डॉक्यूमेंट असते, जे पार्सलवर चिकटवले जाते. ते तपासून ट्रॅकिंग नंबरची खात्री करावी. त्यामुळे तुम्हाला मिळालेले पार्सल तुमचेच आहे याची खात्री होईल.

सायबर क्राइम वाढत आहेत, त्यामुळे सतर्कता आणि सावधानता हाच बचावाचा मार्ग आहे.

गौरव कुलकर्णी

लेखकाबद्दलगौरव कुलकर्णीगौरव कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स येथे कन्सल्टंट डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. २ वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांविषयी लिहित आहे. त्याने यापूर्वी लाइफस्टाइल व अर्थ विषयात लिखाण केले आहे. Times internet संचलित MENSXP आणि Mahamoney.Com येथे त्याने काम केले आहे. यासोबतच त्याला विज्ञान व टेक्नोलॉजी या विषयात विशेष रस आहे. याव्यरिक्त तो लेखक, कवी आणि दिग्दर्शक देखील आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.