Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Noise Colorfit Pulse 4 Max: स्वदेशी ब्रँड नॉइजने AI फीचरसह आणले पहिले स्मार्टवॉच; देईल तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तरी किंमत मात्र परवडणारी
Noise Colorfit Pulse 4 Max Smartwatch: स्वदेशी ब्रँड नॉईजने ‘नॉइज कलरफिट पल्स 4 मॅक्स’ हे नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की AI फीचरसह येणारे हे भारतातील पहिले स्मार्टवॉच आहे.

Noise ColorFit Pulse 4 Max चे फीचर्स
- ॲपल वॉचसारखा लुक आणि AMOLED डिस्प्ले
- नॉईज कलरफिट पल्स 4 मॅक्स ची रचना आणि लुक ॲपल वॉच सारखीच आहे.
- यात स्क्वेअर डायल आहे, वरच्या उजव्या बाजूला मूव्हेबल क्राऊन आणि त्याच्या खाली एक फिजिकल बटण आहे. स्मार्टवॉचमध्ये AOD (नेहमी चालू डिस्प्ले) मोडसह 1.96-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.
- यात कस्टमायजेबल वॉच फेसबरोबरच AI क्रिएट फीचरचा सपोर्ट मिळतो. यामुळे युजर्सना घड्याळावरच AI-जनरेट केलेले वॉचफेस तयार करण्यास परमिशन मिळते.
अनेक हेल्थ फीचर्सना सपोर्ट
- हे घड्याळ अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सना देखील सपोर्ट देते, ज्यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, झोप आणि स्ट्रेस ट्रॅकर समाविष्ट आहे.
- यात विशेषतः महिलांसाठी पीरियड ट्रॅकरदेखील आहे.
- यात ब्रीदिंग प्रॅक्टिस रिमायंडर देखील आहे.
- घड्याळात १०० हून अधिक स्पोर्ट्स मोडला सपोर्ट मिळतो.
AI सर्च फीचर
वॉचमध्ये AI सर्च फीचर देखील आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स थेट घड्याळाशी बोलून प्रश्न विचारू शकतात. स्मार्टवॉच इजी ऍक्सेससाठी पाच QR कोड देखील स्टोअर करू शकते.
कॉलिंगसाठी, घड्याळ मायक्रोफोन आणि स्पीकरसह सुसज्ज आहे.
यामध्ये नोटिफिकेशन डिस्प्ले, हवामान अपडेट, कॅल्क्युलेटर यासह अनेक उपयुक्त फीचर्स आहेत.
पूर्ण चार्ज केल्यावर हे घड्याळ 7 दिवस चालू शकते असे कंपनीचे म्हणणे आहे.
किंमत व उपलब्धता
कंपनीने नॉईज कलरफिट पल्स 4 मॅक्स स्मार्टवॉच जेट ब्लॅक, डीप वाईन, रोझ गोल्ड, स्पेस ब्लू, ब्लॅक लिंक आणि कॅम सिल्व्हर लिंक या रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केले आहे. त्याची किंमत 2,499 रुपये आहे आणि आजपासून (20 जुलै) Amazon आणि Flipkart वरून खरेदीसाठी हे वॉच उपलब्ध होईल.