Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
चांदवड अवैध मद्य तस्करी प्रकरणातील वाहनांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपीस नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने सुरत मधुन घेतले ताब्यात….
नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (७) जुलै २०२४ रोजी रात्रीचे सुमारास चांदवड-मनमाड रोडवर अवैधरित्या
मद्यसाठयाची वाहतुक करणा-या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते. या घटनेत लासलगाव पोलिस ठाण्याचे दोन पोलिस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते. सदरच्या घटने बाबत चांदवड पोलिस ठाणे येथे गु.र.नं. २७३ / २०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१), १०९,१३२, २३८, ३२४(४), १२१ (१), (२), ३(५), ६१ (२) सह मोटर वाहन का. क. १८३, १८४,१३४(अ),(ब)/१७७, ७९ (१), ६१ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तात्काळ दखल घेवून यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यासाठी जिल्हयात व परराज्यात पथके रवाना केली होती. त्यानुसार पोलिस पथकांनी सदर गुन्हयात आरोपी १) देवीश पटेल, २) अशपाक अली शेख, ३) राहुल सहाणी, या तीन आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्हयातील उर्वरित आरोपींचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुजरात राज्यात रवाना करण्यात आले होते. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सुरत शहरात सतत
पाळत ठेवून मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे सदर प्रकरणातील अवैध मद्यसाठयाचे तस्करीसाठी चारचाकी वाहनांचा पुरवठा करणारा आरोपी शोहेब अब्दुल गफुर अन्सारी उर्फ सोहेल छत्री, वय ३९, रा. ७/२०१४, रामपुरा मसालजी वार्ड, हाजरा मंजिल, सुरत, राज्य गुजरात यास शिताफिने ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन सदर गुन्हयात मद्य तस्करीसाठी वापरण्यात आलेली टाटा हॅरिअर कार क्र. जी. जे. २०.ए.क्यु. ४३६७ ही जप्त करण्यात आली आहे.
सदर आरोपीस वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार स्थागुशाचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथक करीत आहे. जिल्हयाचे सीमावर्ती भागातून होणारे अवैध मद्य तस्करीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे सत्वर कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजु सुर्वे, पोउपनि दत्ता कांभीरे, नाना शिरोळे, पोहवा गणेश वराडे, मुकेश महिरे, धनंजय शिलावटे, दिपक गुंजाळ,नापोशि संदिप झाल्टे, प्रकाश कासार, रमेश चव्हाण, नितीन डावखर, मेघराज जाधव तसेच तांत्रिक विश्लेषन विभागाचे प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, भाउसाहेब टिळे यांचे पथकाने केलेली आहे.